प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु विकणाऱ्यावर कारवाई ; एकुण २३,४७,६९५/- रू चा मुद्देमाल सहीत एक आरोपी अटक

नागपूर / उमरेड – पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत बुधवारी पेठ उमरेड येथे दिनांक २९.०४.२३ रोजी महाराष्ट्र येथे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु गुटखा संबधाने रेड केला असता किराणा दुकान व गोडावून मध्ये १) ईगल सुगंधीत तबाखू २) होला सुगधीत तबाखु ३) विराट सुगंधीत तबाखु ४) माजा १०८ सुगंधीत तंबाखु ५). रत्ना ३०० सुंगधीत तंबाखु ६) पान पराग ७) सिल्वर पॅकेट मध्ये सुगंधीत असा एकुण २३,४७,६९५ रू चा माल मिळुन आले.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे – आशिषसिंग ठाकुर यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. उमरेड येथे आरोपी नामे- गोपाल तुळशीराम चौधरी वय ६१ वर्ष रा उमरेड यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन आरोपी क २. संदीप गोपाल चौधरी वय ३५ वर्ष हा फरार असुन त्याचा शोध सुरू आहे. पोस्टे उमरेड येथे दोन्ही आरोपीविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कारवाई विशाल आनंद पोलीस अधिक्षक नागपुर ग्रा, तसेच अपर पोलीस अधिक्षक  संदीप पखाले यांचे आदेशाने स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आशिषसिंग ठाकुर, पोहवा अरविंद भगत, नरेंद पटले, मिलींद नांदुरकर, राजेश रेवतकर, पोना बालाजी साखरे, अजीज शेख, मयुर ढेकळे अमृत किंगे यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन उमरेड हे करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com