नागपूर :- सावनेर येथील तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात कृषि विभागामार्फत प्रगतिशील शेतकरी व महिला गट यांना उत्कृष्ट कामाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
रानभाजी महोत्सवात आयोजन ११ ऑगस्ट २०२३ रोजी पंचायत समिती येथील प्रांगणात करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुनील केदार यांचे हस्ते पार पडले. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनीही रानभाजी महोत्सवाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेची तालुका स्तरीय कार्यशाळा पंचायत समिती सभागृहात पार पडली. याकरिता तज्ञ प्रशिक्षक म्हणून जिल्हा संसाधन व्यक्ती योगराज वाघमारे, उपविभागीय कृषि अधिकारी कुसळकर यांनी शेतकऱ्यांना आणि बचत गटांना सविस्तर मार्गदर्शन केले. सावनेर तालुक्यात पीएमएफएमई योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषि सहाय्यक श्रीमती पुजा इंगळे यांचा देखील प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी राठोड यांनी तर संचलन कृषि पर्यवेक्षक रोशन डांबरे यांनी आणि आभार प्रदर्शन हरिश्चंद्र मानकर कृषि पर्यवेक्षक यांनी केले.
पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे, उपसभापती राहुल तिवारी, पंचायत समिती सदस्य, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र चिखले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण कुसळकर, तहसीलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर, तालुका कृषि अधिकारी शुभांगी राठोड, कृषि अधिकारी मोरेश्वर बावने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कविता काटेखाये, कृषि पर्यवेक्षक रोशन डंभारे, दिनेश कुरळकर, दामोदर बांबल, हरिश्चंद्र मानकर, मोरेश्वर तांबेकर व तालुक्यातील सर्व कृषि सहाय्यक आणि मोठ्या संख्येने रानभाजी उत्पादक शेतकरी, आत्मा आणि उमेद नोंदणीकृत बचत गटाचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.