अवैधरीत्या देशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

नरखेड :- अंतर्गत मोहगाव रोड नरखेड येथे दिनांक ११/०१/ २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, ना.या पथक यांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम अवैधरित्या मोहगाव रोड नरखेड येथे एक ज्युपिटर मोटरसायकल क्र. MH 40-CG-9621 वर देशी दारूची वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने घटनास्थळी जावुन नाकाबंदी करून ज्युपिटर मोटरसायकल क्र. MH 40-CG-9621 ला थांबवून चेक केले असता आरोपी नामे देवेंद्र नामदेवराव कावडकर, वय २९ वर्ष, रा. तिष्टी बु त. कळमेश्वर, जि. नागपूर हा विनापरवाना व अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीकडुन ९२ देशी दारू निपा १८० एम. एल प्रमाणे प्रत्येकी ७०/-रु प्रमाणे असा एकूण ६४४०/- रु. व एक ज्युपिटर मो. सा. क्र. MH 40/CG-9621 किंमती ४०,०००/-रुपये असा एकूण ४६,४४०/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुध्द कलम ६५ (ई) (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे नरखेड यांचे ताब्यात देण्यात आले. आरोपीला सुचनापत्रावर रिहा करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक फौजदार चंद्रशेखर पडेकर, पोलीस हवालदार प्रमोद तभाने, रणजित जाधव यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Supreme Court Sets Aside Speaker's Order Disqualifying Manipur MLA's Keshtrimayum Biren Singh, Yengkhom Surchandra Singh & Sanasam Biren Singh

Fri Jan 12 , 2024
New Delhi :-The Supreme Court today set aside an order of disqualification passed by the Speaker of Manipur Legislative Assembly disqualifying Keshtrimayum Biren Singh, Yengkhom Surchandra Singh and Sanasam Biren Singh from the term of the 11th Legislative Assembly of Manipur.Opining that since the order passed by the Speaker has been set aside, the bench of Justices UU Lalit, S […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!