प्रहार मिल्ट्री स्कूल तर्फे स्वामी विवेकानंद आंतरशालेय फुटबॉल व हँडबॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

नागपूर :- सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या प्रहार मिलिटरी स्कूल दि. 30/11/23 ते दि. 3/12/23 डिसेंबरला फुटबॉल आणि 1/12/23 ते 3/12/23 डिसेंबर हँडबॉल स्पर्धेचा पारितोषिक सोहळा संपन्न झाला. तसेच हँडबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरच्या प्रांगणात 3 डिसेंबर रोजी संपन्न झाला.

फुटबॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण अब्दुल खालिक, (इंटरनॅशनल फुटबॉल प्लेयर, इंडियन रेल्वे) यांच्या हस्ते विजेत्या चमूला धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत रोख व सन्मानचिन्ह देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी केले. प्रतियोगिता म्हंटले की पारितोषिकाची ही उत्सुकता असतेच. फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षाखालील विजेती चमू प्रथम पारितोषिक पाटकिविणारे- सेंट जॉन्स स्कूल’ नागपूर, द्वितीय पारितोषिक पटकविणारी विजेती चमू- दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी रोड, नागपूर त्याचबरोबर प्रहार मिलिटरी स्कूल तर्फे आंतरशालेय हँडबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि.३ डिसेंबरला संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणावर संपन्न झाला. या पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी जितेंद्र घोरदाडेकर (पंडित बच्छराज विद्यालयाचे क्रीडा शिक्षक) यांच्या हस्ते विजेत्या चमूला पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत १४ वर्षाखालील प्रथम पारितोषिक विजेते चमू-मुलांमधील विजेतेपद लखोटिया भुतडा हायस्कूल, कोंढाळी मुलींमधील विजेतेपद लखोटिया भुतडा हायस्कूल कोंढाळी.

द्वितीय पारितोषिक – मुलींमधील उपविजेतेपद स्कूल ऑफ स्कॉलर्स, बेलतरोडी मुलांमधील उपविजेतेपद प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर, नागपूर

तसेच १७ वर्षाखालील विजेती चमू प्रथम पारितोषिक- मुलींमधील विजेतेपद लखोटिया भुतडा हायस्कूल, स्टेट बोर्ड, कोंढाळी विजेतेपद लखोटिया भुतडा हायस्कूल सी.बी.एस.सी, कोंढाळी.

द्वितीय पारितोषिक -मुलींमधील उपविजेतेपद स्कूल ऑफ स्कॉलर्स मुलांमधील उपविजेतेपद प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर, नागपूर

त्याच बरोबर १९ वर्षाखालील विजेती चमू

प्रथम पारितोषिक- मुलींमधील जी.एच रायसोनी

मुलांमधील लखोटिया भुतडा हायस्कूल, कोंढाळी

द्वित्तीय पारितोषिक-

मुलींमध्ये उपविजेतेपद सांदीपनी स्कूल, नागपूर

मुलांमधील उपविजेते सांदीपनी स्कूल नागपूर

सतरा वर्षाखालील लखोटीया सी.बी.एस.सी शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्तम खेळासाठी विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

फुटबॉल स्पर्धेत एकूण 16 शाळांनी तर हँडबॉल स्पर्धेत एकूण 18 शाळांनी शाळांचा सहभाग होता. फुटबॉल व हँडबॉल स्पर्धेच्या आयोजकांसाठी ज्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. त्या सर्वांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे संचालन शाळेच्या शिक्षिका रीता चौधरी यांनी केले तर हँडबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे संचालन मृणाल काटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेषतः क्रीडाशिक्षक यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी हे प्रशिक्षक या सर्वांचे योगदान होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समृद्धि कॉन्क्लेव नामक डीपटेक स्टार्टअप प्रोत्‍साहन अभियान का आईआईटी रोपड़ में उद्घाटन  

Mon Dec 4 , 2023
नई दिल्ली :-पंजाब के राज्यपाल और चंडीगढ़ के प्रशासक  बनवारीलाल पुरोहित ने कृषि और जल प्रौद्योगिकी में नवाचार को बढ़ावा देने के लिए समर्पित डीपटेक स्टार्टअप प्रोत्‍साहन देने वाले कार्यक्रम का उद्घाटन किया, जिसे समृद्धि (बाजार, अनुसंधान, नवाचार और विकास के लिए रणनीतिक प्रोत्‍साहन : आईसीपीएस स्टार्टअप के लिए एक समग्र पहल) कहा जाता है। इसे इंटरडिसिप्लिनरी साइबर-फिजिकल सिस्टम्स (एनएम-आईसीपीएस) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com