निःशुल्क संगणक उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण !

टुगेदर व्ही फाईट फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम

वाडी :- वाडी परिसरातील सामाजिक संस्था टूगेदर व्ही फाईट फाउंडेशन दवारे रविवार ला फाउंडेशन द्वारे संचलित निःशुल्क संगणक प्रशिक्षनानंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाडी पोलीस स्टेशन चे द्वितीय पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या हस्ते 18 प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या फाउंडेशनद्वारा सामाजिक दायित्व समजून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना एम एस सी आई टी हा अभ्यासक्रम निशुल्क स्वरूपात कंप्यूटर प्रशिक्षण प्रदान करण्यात येते. प्रशिक्षण समाप्तीनंतर त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्याना सर्टिफिकेट प्रदान करन्याचा हा सामाजिक उपक्रम संचालित करण्यात येत असतो. प्रस्तावनेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व्यापार आघाडी चे अध्यक्ष व संस्था संचालक राजकुमार वानखेडे ने अतिथीना माहिती दिली की  गत 1 वर्षा पासून हे निःशुल्क प्रशिक्षण गरीब व गरजू विद्यार्थाना देण्यात येत आहे. प्रशिक्षिताना घरून ही कार्य करणे ची सुविधा भी दिली जाते.विशेष अतिथी विनोद गोडबोले नी संस्थेद्वारे चालविलेल्या या उपक्रमाची स्तुती करून समाजहिता साठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले.व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन ही केले. या प्रसंगी संस्थे चे कर्मचारी सुभाष जोशी, ज्योति सोमकुवर, भारती वानखेडे, सपना लाल, मीनाक्षी ढोके ,दीपक कोरे, शारदा कोरे उपस्थित होते.संचलन मीनाक्षी ढोके व आभार सुभाष जोशी ने व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने ‘अचानक येणार्‍या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी CPR प्रशिक्षणा’चे आयोजन !

Tue Oct 18 , 2022
नागपूर :- येथील राजराजेश्वरी मंदिर, अत्रे ले आऊट, कोतवाल नगर येथे हिंदु जनजागृती समिती अंतर्गत आरोग्य साहाय्य समिती द्वारे CPR प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. CPR म्हणजे ‘हृदय – श्वसन पुनरुज्जीवन तंत्र ‘. गंभीर स्थितीतील रुग्णासाठी वैद्यकीय सहाय्य मिळेपर्यंतची संजीवनी होय ! या तंत्राने अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. अलिकडे वाढत्या ताण तणावामुळे आणि बदललेल्या जीवन शैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com