डोक्यावर सिमेंट पत्र्याने मारून केले गंभीर जख्मी

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट पिपरी रोडवर अमरदीप ने शुल्लक वादातुन विमलच्या डोक्यावर सिमेंट पत्र्याच्या तुकड्याने मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी विमल यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी अमरदीप विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.२९) डिसेंबर ला सकाळी ७ वाजता दरम्यान विमल शंकरराव वर्मन वय ३४ वर्ष रा.वार्ड क्र. २ पिपरी-कन्हान हा आपल्या मित्र अरविंद सोबत पिपरी गाडेघाट रोड वरील चौकात बसला असतांना विमल याने अरविंद ला म्हटले कि या भिकारी चौकात आपण नाही बसु, आपण दुसरीकडे जाऊ असे म्हटले असता चौकात हजर अमरदीप उर्फ डमरु याने रस्त्याच्या बाजुला पडलेल्या सिमेंट पत्र्याच्या तुकड्याने विमलच्या डोक्यावर मारुन गंभीर जख्मी केले आणि शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी विमल यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी अमरदीप विरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com