राष्ट्रपतींचा दौरा; चार हजार पोलिस तैनात

– शहरात जागोजागी कडक बंदोबस्त

नागपूर :- नागपूर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा १ व २ डिसेंबरला नागपूर दौरा आहे. त्यामुळे शहरात जवळपास ४ हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी स्वतः राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या मार्गाचे निरीक्षण करीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. तसेच वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत.

उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थाही बिघडलेली आहे. १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा असल्यामुळे पोलिसांसमोर वाहतुकीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या शहरात खासदार महोत्सव आणि अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. त्यात राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस उपायुक्तांची बैठक घेऊन सुरक्षेबाबत आढावा घेतला. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये।

चार मार्गावर ‘नो पार्किंग झोन’ घोषित

राष्ट्रपती यांच्यासोबतच राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेतेदेखील शहरात राहणार आहेत. त्यामुळे वर्धा मार्ग, धंतोली, रहाटे कॉलनी, सिव्हिल लाईन्स, रेशीमबाग चौक, मेडिकल चौक, तुकडोजी चौक इत्यादी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात ठेवून चार मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहे. तसेच बॉम्बशोधक-नाशक पथक, अतिदक्षता पथक, गृहरक्षक दलाचे जवान सज्ज आहेत.

अबाधित राहावी, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात काही रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याकडे वळती केली आहे. काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे जर अजनी, मेडिकल चौक, धंतोली किंवा रहाटे कॉलनी चौकासह काही विशिष्ट मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी अधिसूचना जारी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन 1 डिसेंबरला

Thu Nov 30 , 2023
– श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या शृंखलेत आणखी एक सेवाभावी उपक्रम नागपूर :- श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमातील शृंखलेत आणखी एका सेवाभावी कार्याची भर पडत आहे. राजकीय क्षेत्रातील अग्रणी स्व. गंगाधरराव फडणवीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ नागपुरात गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरच्या निर्मितीसाठी भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com