नागपूर :- माहे जून 2024 च्या निवृत्तीवेतनासोबत 7 व्या वेतन आयोगाचा अंतिम हप्ता प्रदान करायचा असून सदर प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याचे निवृत्तीवेतन अदा करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे प्रभारी वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.