पोलीस ठरले देवदूत

कुही :-पोस्टे कुही अंतर्गत अवकाळी पावसानंतर अचानक तापमानात वाढ झाली असून तापमान 41 पर्यंत पोहचला आहे. शुक्रवारी निवडणुकीची पेट्रोलिंग सुरु असताना रस्त्याकडेला वेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीस कुही पोलिसांनी तत्काळ दवाखान्यात भरती करत त्याचे प्राण वाचविले आहे.

Ips दीपक अग्रवाल आपल्या बमुसह निवडणूक पेट्रोलिंग करत असताना भोजापूर नजीक मुख्य रस्त्याच्या कडेला किन्ही येथील भोजराज कोकाटे नामक इसम बेशुद्ध स्थितीत दिसून आला. तत्काळ कुही पोलिसांनी माणुसकी दाखवत त्या इसमास कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे वेळेवर उपचार मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचले असून कुही पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरांवरून कौतुक होत आहे. यावेळी हिवराज लांजेवार, भूमेश्वर भेंडारकर, विठ्ठल लिंबेकर, दर्शन पाटील आदी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या चैन स्नेचिंग..

Sun Apr 21 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या ‘प्रयत्न’जन संपर्क कार्यालया जवळ मोलमजुरी करून थकून घरी परत येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर असलेल्या दोन अज्ञात आरोपीने सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची घटना आज सायंकाळी सात दरम्यान घडली असून नुकसान झालेल्या महिलेचे नाव रेखा भारत बोरकर वय 60 वर्षे रा हमालपुरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com