माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या चैन स्नेचिंग..


संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 21:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या ‘प्रयत्न’जन संपर्क कार्यालया जवळ मोलमजुरी करून थकून घरी परत येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर असलेल्या दोन अज्ञात आरोपीने सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची घटना आज सायंकाळी सात दरम्यान घडली असून नुकसान झालेल्या महिलेचे नाव रेखा भारत बोरकर वय 60 वर्षे रा हमालपुरा असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर महिला कामाहुन पायी पायी घराजवळ पोहोचले असता पाठलाग करीत असलेल्या दोन तरुनानी सदर महिलेजवळ दुचाकी थांबवून पत्ता विचारण्याचा बहाणा करीत संधी साधून त्वरित सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला.घटना घडताच महिलेने मदतीची हाक मागत आरडा ओरड केले असता माजी नगरसेवक कपिल गायधने तसेच शेजारी मंडळींनी मदतीची धाव घेतली मात्र तोवर आरोपीने पळ काढण्यात यश गाठले होते.घटनेची माहिती पोलिसांना कळताच जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपीच्या शोधार्थ तपास यंत्रणेला गती देत घटनास्थळ जवळील माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या ‘प्रयत्न’ जनसंपर्क कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू असून या सीसीटीव्ही फुटेज मध्ये घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून लवकरच आरोपीचा छडा लावण्यात यश येईल असा विश्वास पोलिसांनी नुकसान धारक महिलेला दिला आहे.

@filephoto@photocredit-maalaimalar

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 317 अर्ज वैध

Mon Apr 22 , 2024
मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 मतदारसंघात 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 317 उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात 21, बारामती-46, उस्मानाबाद-35, लातूर-31, सोलापूर-32, माढा-38, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com