– देशी दारूच्या १४८ निपा सह दुचाकी असा ४१८६० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
कन्हान :- होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभुमीवर कन्हान पोलीस पेट्रोलिंग करित असताना गुप्त बातमीच्या आधारे वेकोलि जुन्या सब एरिया कार्यालय जवळ नाकाबंदी करून संशयित दुचाकी वाहन थांबवुन पाहिले तर हिरो एचएफ डिलक्स दुचाकी वाहनाच्या पेट्रोल ट्रॅंक वर दोन खाकी रंगाचे भिंगरी देशी दारुच्या पेटयात निपा दिसुन आल्याने पोलीसांनी चालक रविशंकर गिरी रा. खदान यास पकडुन त्याचा जवळुन ४१८६० रू. चा मु्द्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
गुरुवार (दि.१४) मार्च ला सायंकाळी ४.३० वाजता कन्हान पोलीस खदान परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि, खदान नं. ६ कडुन खदान नं.३ कडे एक इसम दुचाकी वाहनाने दारुची वाहतुक करणार आहे. अश्या माहिती वरुन पोलीसांनी वेकोलिच्या जुन्या सब एरिया कार्याल य जवळ नाकाबंदी करित असतांना संशयित दुचाकी वाहन येतांना दिसल्याने चालकास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता वाहन हे हिरो एच एफ डिलक्स दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० बी आर ७०९८ असल्याचे दिसले. पेट्रोल ट्रॅंक वर दोन खाकी रंगाचे भिंगरी देशी दारु लिहलेले खोके ठेवलेले दिसल्याने पोलीसांनी खोक्याची पाहणी केली असता देशी दारु च्या निपा दिसुन आल्या. पोलीसांनी चालक रविशंकर मोतीचंद गिरी वय २८ वर्ष रा. खदान ला अटक करुन त्याचा जवळुन १४८ निपा किंमत ६८६० रुपये आणि दुचाकी वाहन किंमत ३५,००० रुपये असा एकुण ४१,८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी रविशंकर गिरी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.