संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-19 जुगाऱ्याना अटक,8 लक्ष 36 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 9 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी, सम्राट नगर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व सहकारी पोलीस पथकांनी धाड घालण्याची यशस्वी कारवाई गतरात्री साडे अकरा दरम्यान केली असून या धाडीतून 19 जुगाऱ्याना अटक करीत त्यांच्याकडून 52 तास पत्ते, नगदी 19 हजार 750 रुपये , विविध कंपनीचे 19 मोबाईल किमती 67 हजार रुपये 9 वाहने किमती 7 लक्ष 50 हजार रुपये असा एकूण 8 लक्ष 36 हजार 750 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
अटक 19 जुगाऱ्यात अब्दुल गफ्फार उर्फ कल्लू अब्दुल जब्बार वय 36 वर्षे रा नया गोदाम कामठी, गजफ्फर सईद मोहम्मद जहीर वय 70 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी, सादिक अखतर नसीम अखतर वय 32 वर्षे रा नयागोदाम कामठी,समीर अहमद जमील अहमद वय 32 वर्षे रा वारीसपुरा कामठी,मोहम्मद इलियाज मोहम्मद जहीर वय 44 वर्षे रा भोई लाईन कामठी, महमूद अख्तर अता उलराहमान वय 45 वर्षे रा वारीसपुरा,कमाल अहमद मोहम्मद साबीर वय 50 वर्षे इमलिबाग कामठी, जावेद अख्तर खलील अहमद वय 47 वर्षे रा कोळसा टाल, राजकुमार सेठिया वय 56 वर्षे रा रणाळा , मोहम्मद जहिर अब्दुल सत्तार वय 65 वर्षे लकडगंज ,सचिन लोहे वय 30 वर्षे दाल ओली , दशरथ महादेव कापसे वय 40 वर्षे रा फेरूमल चौक , रिजवान अख्तर मोहम्मद अश्फाक वय 45 वर्षे रा इस्माईलपुरा , सतीश श्यामराव आसवले वय 51 वर्षे रा गणेशपेठ नागपूर,मो आरिफ अब्दुल रशीद वय 40 वर्षे रा बी बी कॉलोनी, विष्णू शंकरलाल गौर वय 62 वर्षे रा संत्रा मार्केट नागपूर, नाजीम खान रसुल खान वय 52 वर्षे रा मचीपूल ,एहफाज अहमद अनावरुल हक्क वय 54 वर्षे रा सैलाब नगर ,मोईन अख्तर नियाज अहमद वय 48 वर्षे रा नयाबाजार कामठी असे आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, एसीपी नयन आलूरकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे , दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या माँर्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे , पोलीस हवालदार पप्पू यादव,संतोषसिह ठाकूर,अखिलेशराय ठाकूर,निलेश यादव,मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर,अतुल राठोड,सुधीर कनोजिया,संदीप गुप्तां, उपेंद्र यादव,सुरेंद्र शेंडे यांनी केली.