सावनेर पोलीसांकडून अट्टल घरफोडीचे गुन्हेगाराना अटक करून त्यांचेकडून ०८ गुन्हे उघड करून चोरीचा मुददेमाल हस्तगत

सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथे दाखल झालेले अप क्र., २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम ४, २५ आर्म अॅक्ट मध्ये अटक केलेले आरोपी १) आकाश विलास लांजेवार वय २४ वर्ष, २) सुरज संजय कोहळे वय २१ वर्ष दोन्ही रा. नंदनवन झोपडपटटी नागपुर यांना अटक करून त्यांचे कडुन घरफोडी करने करीता वापरलेली कार आय २० क्रमांक एम. एच- ०२ / ९७२५,०१ तलवार व घरफोडीचे साहीत्य असा १,००,३९०/- रु- चा मुददेमाल जप्त करून त्यांचे कडुन पाटणसावंगी व सावनेर परिसरातील पोलीस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले घरफोडीचे ८ गुन्हे उघड करून चोरी केलेल्या मालापैकी सोनार अंकुश गणपतराव नेरकर वय ३३ वर्ष रा. दिघोरी नागपुर व सबीन दत्तात्रय कावळे रा. इतवारी नागपुर यांचेकडुन १८.९९ तोळे सोने व ४ तोळे चांदीचे दागीने किमंत ६,७९,३४२/- रूपये असा एकुण किंमती ७,७९,७३२/- रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के, पोलीस निरीक्षक रवीन्द्र मानकर, सहायक पोलीस निरीक्षकक शिवाजी नागवे, शरद भस्मे, चालक सफी राजु कडु, पोलीस हवालदार रवीन्द्र वटप, अतुल खोडनकर अविनाश बाहेकर, माणिक शेरे, चालक पोहवा प्रितम पवार, पोलीस नाईक रंजन कावळे, पो शि अंकुश मुळे, अशोक निस्ताने यांनी केली आहे.

NewsToday24x7

Next Post

सुगंधीत तंबाखूची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

Tue Jan 23 , 2024
सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील हेटी ते तेल कामठी रोड ने कंटेनर मध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखु घेवुन जात आहे अशी गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली वरून सदर कंटेनर चा पाठलाग केला असता सदर कंटेनर चालक हा कंटेनर सोडुन पडुन गेला कंटेनर क्रमांक आर जे ११ जी सी ५८१३ ची पाहणी केली असता कटेनर मध्ये १०० गेरु रंगाचे प्लास्टिक बोऱ्या मध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com