सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८४ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.२१) रोजी उपद्रव शोध पथकाने ८४ प्रकरणांची नोंद करून ४७ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २३ प्रकरणांची नोंद करून ९२०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून २०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून ४८०० रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृह, लोजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालय कॅटरस सर्व्हिस प्रोव्हायडर आदींनी रस्तावर कचरा टाकणे या याअंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून १३००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २४ प्रकरणांची नोंद करून रु ४८०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ११ प्रकरणांची नोंद करून रु ११००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

DELHI PUBLIC SCHOOL MIHAN SKATERS FIND BERTH IN STATE CHAMPIONSHIP

Thu Feb 22 , 2024
Nagpur :-Students of Delhi Public School MIHAN brought laurels to the school when they won several medals in the Nagpur District Mini Roller Skating Championship organized by the Nagpur District Roller Skating Association on 18th February 2024. Anaya Bishnoi,Preetish Dutta ,Saiish Muchhal won 2 Gold medals for their outstanding achievements in different events while Samaira Jaiswal ,Archisha Vashishth were awarded […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com