गुन्हेगारीला ब्रेक लागण्यासाठी पोलीस चौक्या सुरू होणे गरजेचे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा आलेख बघता कामठी शहरातील पूर्ववत बंद पडलेल्या पोलीस चौक्या नित्याने सुरू करणे गरजेचे आहे.

याचबरोबर काही ठिकाणी नवीन पोलीस चौक्या सुरू कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मागील काही महिन्यापासून कामठी शहरात चोरीसह, घरफोडी तसेच इतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.त्यातही काही नागरीक पोलिसांच्या चौकशीचा त्रास नको म्हणून चोरी झाली तरी त्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यास धजावत नाहीत.वास्तविकता चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांप्रमाणे नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. बाहेरगावी जाताना जवळच्या पोलीस ठाण्यात सूचना देण्याचे आवाहन करूनही नागरिक या आवाहनाला दाद देत नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांचे मत आहे. तर आगामी निवडणुकाचा वेळ लक्षात घेता शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे यासाठी नागरि हितार्थ शहरातील मुख्य ठिकाणी पोलीस चौक्या सुरू करण्यात याव्या अशी मागणी जोर धरत आहे.

कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एकमेव ड्रॅगन पॅलेस पोलीस चौकी नामधारी म्हणून कार्यरत आहे त्यातील मोदी पडावं पोलीस चौकी अजूनही बंद अवस्थेत आहे तेव्हा गरजेचे असलेल्या मच्छिपुल चौक, गोयल टॉकीज चौक, फेरूमल चौक,भाजी मंडी चौक, पासीपुरा मैदान, रमानगर, रामगढ आदी ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात याव्या अशी मागणी जोर धरत आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Tue Jun 18 , 2024
नागपूर :-पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. ९. सुदर्शन नगर, चैतन्य हार्डवेअर समोर, न्यु नरसाळा रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी प्रकाश मधुकरराव खोडके, वय ६५ वर्षे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन शेगांव येथे देवदर्शनाकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख १५,०००/- रू. असा एकुण किंमती ४,४०,०००/- […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com