शांतीवन चिचोली शिवरातील फेटरी ते खडगाव रोडवरील शेतात खुल्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्डयावर पोलीसांची धाड एकुण ३४,७७,३००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

नागपूर :-दि. ०६/०२/२०२४ रोजी मौजा शांतीवन चिचोली परिसरात फेटरी ते खडगाव रोडवर पार्थ प्रिकास्ट कंपनीचे जवळील झाडीझुडनीचे बाजुला असलेल्या शेतात काही ईसम पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ खेळत असल्याबाबत माहीती अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांना मिळाल्यावरून त्यांनी सपोनि, राकेश साखरकर, पोउपनि दोनोडे, परि, पोउपनि गेडाम, तसेच सोबत पो.स्टे. केळवद व तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर येथिल स्टॉफ व आर. सी.पी. पथकास पो.स्टे. केळवद येथे बोलावुन त्यांना योग्य सुचना देवुन खाजगी वाहनांनी जुगारी ईसमांवर छापा टाकण्यासाठी पाठविले असता मौजा चिचोली शांतीवन शिवारातील फेटरी ते खडगाव रोडवरील एक शेतात खुल्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक लाईटचे उजेडात काही ईसम पैशान्ने हारजीतचा जुगार खेळ खेळतांना दिसुन आल्याने पोलीस स्टाफने सिनेस्टाईल पध्दतीने घेराव घालुन लपतछपत जावुन धाड टाकली असता पोलीसांना पाहुन काही जुगारी ईसम अंधाराचा फायदा घेत पळुन गेले.

घटनास्थळी १) गणेश आनंदराव चाचेकर वय ४९ वर्ष रा. गोरेवाडा पुरानी वस्ती नागपुर २) आकाश सुभाष खंडाते वय २६ वर्ष रा. हिंदी नगर सरोज शाळेजवळ नागपुर ३) प्रशांत दशरथ मस्के वय ४० वर्ष, रा. जयताळा माउली मंदीर जवळ नागपुर ४) अमीत विजय मेश्राम वय ३४ वर्ष रा. इंदोरा बौध्द विहाराजवळ नागपुर ५) राजेश एकनाथ पुणेकर वय ४९ वर्ष रा. गोलीबार चौक कोसारकर मोहल्ला नागपुर ६) सुनिल गम्मु पटेल वय ४२ वर्ष रा. गोरेवाडा पुरानी वस्ती नागपुर ७) सुधिर भाउराव धुमाळे, वय ३६ वर्ष रा. गोरेवाडा पुरानी वस्ती नागपुर ८) आनंद देवशंकर वर्मा, वय ३० वर्ष रा. पेटरी ताई क. ०१ ता. कळमेश्वर ९) ऋषभ सुरेश राउत वय २७ वर्ष रा. हुडको कॉलनी वार्ड क्र. १४ कळमेश्वर १०) राकेश दशरच येलेकर, वय २३ वर्ष रा, बोंडाळा लावा वाडी रोड वार्ड क्र. ३ नागपुर ११) सुधाकर चौडबाजी घनचक्कर वय ७० वर्ष रा. हिंगणा तहसिल कार्यालयासमोर वार्ड क्र. ०६ नागपुर १२) वसिम अक्तर खान, वय ३५ वर्ष रा. कोराडी हनुमान मंदीर जवळ वार्ड क्र. ०२ नागपुर १३) संजय विष्णु धोतरे वय ४९ वर्ष रा. संजय नगर एन. आय. टी. कॉलेजजवळ नागपुर १४) अमोल मनोहर बावणे वय ३२ वर्ष रा. व्याहाङ चौदामैल कळमेश्वर १५) मयुर सुधिर मेश्राम वय २७ वर्ष रा. रमाबाई आवेडकर नगर जयताळा नागपुर है जुगारी ईसम मिळुन आले त्यांचे ताच्यातुन एकुण नगदी ५३३००/- रू. व वेगवेगळया कंपनीचे मोबाईल तसेच आरोपींच्या घटनास्थळावरील तीन चारचाकी व अकरा दुचारी वाहने असा एकूण ३४,७७,३००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून त्यांचेविरूध्द पो.स्टे. कळमेश्वर येथे अपराध क्र. ६८/२०२४ कलम १२ म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनात सपोनि राकेश साखरकर पो.स्टे. केळवद, पोउपनि व्यकटेश दोनोडे, परि. पोउपनि स्वप्नील गेडाम, पोहवा सुधिर यादगिरे, पोहवा दिनेश काकडे, पोशि नितेश पुसाम, पोशि धोंडुतात्या देवकते, पोशि पंकज कोहाड़, पोशि गणेश उईके, सफौ. मन्नान नौरंगाबादे, पोहवा पंकज गाडगे, पोहवा रवी बांबल, पोशि श्रिकांत पात्रे तसेच आर. सी.पी. पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्नीची हत्या करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

Fri Feb 9 , 2024
अरोली :- अंतर्गत मौजा कोदामेंढी येथे दि. ०८/०२/२०२४ चे ०८.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- उमेश जगन शेंडे याला फोनव्दारे माहिती मिळाली की, तुझी बहिण मृतक नामे हिरा विजय गुरनुले, रा. कोदामेंढी हिचा मृत्यु झाला आहे. असे कळल्यावर फिर्यादी घरी गेला असता त्या ठिकाणी फिर्यादीची बहिण हिरा हि मृत अवस्थेत पडलेली होती, याबाबत मृतक बहिणीची मुलगी कल्याणी विजय गुरनुले हिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com