नागपूर :- धापेवाडा विठ्ठल रूख्मणी देवस्थान विर्दभाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीला येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. 29 जुन ते 4 जुलै 2023 दरम्यान धापेवाडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरामध्ये वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून पुलाखालील मार्गावरील दोन्ही बाजुने ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांनी कळविले आहे.
मंदिर परिसरामध्ये दुचाकी वाहनाने दर्शनाकरिता येतात यामुळे वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मोटार व वाहन कायदा 1988 चा नियम 59 नुसार या पार्श्वभूमिवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहे.