जुनी कामठी पोलिसांनी दिले 14 गोवंश जनावरांना जीवनदान

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 8:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील बोरकर चौक जवळून एका पांढऱ्या रंगाच्या टाटा योद्धा वाहनातून गोवंश जनावरे वाहून नेत असता जुनी कामठी पोलिसांनी वेळीच सदर वाहनावर धाड घालून वाहनातील 14 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सदर गोवंश जनावरांना हलवुन जुनी कामठी पोलिसांनी 14 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री 2 दरम्यान केली असून घटनास्थळाहुन पसार झालेल्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर या कार्यवाहितुन जप्त गोवंश जनावरे व वाहन असा एकूण 5 लक्ष 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गतरात्री 2 दरम्यान बोरकर चौक मार्गे एक टाटा पिकअप वाहन क्र एम एच 40 बी जी 3261 ने गोवंश जनावरे वाहून नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर वाहनावर धाड घालण्यात यश गाठले .मात्र वाहनचालकाने वाहन सोडुन पळ काढण्यात यश गाठले.पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन जप्त गोवंश जनावरे गोरक्षण शाळेत हलविन्यात आले.तर पसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या कार्यवाहितुन जप्त टाटा पिकअप वाहन किमती 4 लक्ष रुपये, 14 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 40 हजार रुपये असा एकूण 5 लक्ष 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही यशस्वी कारवाही डिसीपी चिन्मय पंडित , एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, पोलीस उपनिरिक्षक केरबा माकने, सुरेश राठोड, महेश कठाने, अंकुश गजभिये, संदीप पानतावणे ,अरविंद झाडे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बाबूलखेडा येथे 'दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याला सुरुवात

Mon May 9 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 9:- दिनांक 27 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत रोजगार हमी कामठी तालुका आढावा समितीने ग्रामपंचायत बाबूलखेडा येथे चार दिवस निवासी राहून ग्रामस्थांना संकल्पना समजावून प्रत्येक घरी भेटी देऊन तसेच प्रभातफेरी, गावफेरी व शिवारफेरी ह्या माध्यमातुन संपूर्ण गावाचे तथा ग्रामपंचायतचे पुढील दहा वर्षाचे नियोजन करण्यात आले तसेच रोजगार हमी योजनेचे अधिकारी तसेच बीडीओ अंशुजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!