15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात कुणी नसल्याचे संधी साधून पीडितेच्या घरात तसेच तिच्या घराशेजारील झाडी झुडपीत लैंगिक अत्याचार करीत याबाबत कुणाशी वाच्यता केल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली ही घटना मागील चार महिन्यात घडली असून यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध भादवी कलम 376,जे एल एन,506 भादवी सहकलम 4,8 ,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल केला.

आरोपीमध्ये राजू गभने वय 50 वर्षे ,मोईन वय 25 वर्षे दोन्ही  तसेच अशोक यादव वय 50 वर्षे  कामठी चा समावेश आहे.पीडित अल्पवयीन मुलगी ही हलक्या स्वरूपात डोक्याला कमजोर असून पीडितेचे आई,वडील व भाऊ कामावर गेले असता सदर पिडीत मुलगी घरी एकटीच राहत होती .मात्र या पीडित मुलीवर वक्रदृष्टी ठेवून असलेल्या सदर आरोपीनी लैंगिक अत्याचार केला व याबाबत कुणाशी वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे 'ऊर्जा' चाट बोट

Sat Mar 16 , 2024
नागपूर :- महावितरणच्या वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीजजोडणी अशा विविध कामांसाठी मदत मिळावी याशिवाय त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारीत चाट बोट सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, लवकरच ती मोबाईल फ़ोन अॅप्लिकेशनवर देखील उपलब्ध होणार आहे. अनेकदा ग्राहकांना महावितरणच्या सेवेबाबत अडचणी येतात. प्रत्येकवेळी कार्यालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights