मंगळवारी झोन अंतर्गत सिवर चेंबरवरील झाकण चोरी करणा-यांविरोधात पोलिस तक्रार

नागपूर :– नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग क्र. १ अतंर्गत विविध भागांमधील सिवर लाईन चेंबरवरील लोखंडी झाकण चोरी झाल्याप्रकरणी मनपाद्वारे पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मंगळवारी झोनच्या कनिष्ठ अभियंत्यांद्वारे जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

प्रभाग क्र. १ अतंर्गत युनियन बँक, जरीपटका, चौधरी चौक, डब्ल्यू.सी.एल. रोड, सी.एम.पी.डी.आय.रोड, डी.एम. हॉस्पीटल, बजाज कॉलेज या परीसरातील सिवर लाईन चेंबर वरील लोखंडी झाकण दिनांक २८/०४/२०२३ ते दिनांक ०३/०५/२०२३ रात्रीच्या वेळेला अज्ञात व्यक्तीकडून चोरीला नेण्यात आले. एकूण ८ सिवर चेंबर वरील लोखंडी झाकण प्रती नग ८००० रुपये याप्रमाणे एकूण ६४००० रुपये किंमतीचे झाकण चोरीला गेलेले आहेत. सदर बाब निदर्शनास येताच मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून अज्ञात चोरट्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेल्वे कार्यालयात कर्मचार्‍यांचे आंदोलन

Tue May 9 , 2023
-विविध मागण्यांसाठी सीआरएमएस सरसावली नागपूर :- जुनी पेंशन सुरू करावी, या मुख्य मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (सीआरएमएस) मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन केले. तसेच मुख्य कार्यालयाला निवेदन सादर केले. तत्पूर्वी संघटनेतर्फे रॅली काढण्यात आली. सीआरएमएसने एक ते 8 मे पर्यंत कामगार सप्ताहा दरम्यान कर्मचारी जनजागरण सप्ताह पाळला. या दरम्यान कर्मचार्‍यांना सतत भेडसावणार्‍या समस्या त्यांच्या कडून जाणून घेतल्या तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com