गतीने सेवा देण्यास कामठी तालुका प्रशासन सदैव कटिबद्ध – तहसीलदार अक्षय पोयाम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागरिकांची विविध विभागांची प्रलंबित कामे मंडळ स्तरावर मार्गी लावण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व नागरिकांना देण्यासाठी व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एकाच छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम मंडळ स्तरावर दर शुक्रवारी राबविण्याचे निर्देशित केल्याप्रमाणे या उपक्रमाची अंमलबजावणी करीत काल शुक्रवारी 24 सप्टेंबर ला कामठी तालुक्यातील कोराडी येथील विठ्ठल रुखमाई देवस्थान सभागृहात ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये उपस्थित नागरिकांना सेवा देण्यास कामठी तालुका सदैव कटिबद्ध असल्याचे मौलिक प्रतिपादन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी व्यक्त केले.

या उपक्रमात कामठी पंचायत समिती, उप अधीक्षक भूमी अभिलेख, वन परिक्षेत्र अधिकारी नागपूर, तालुका कृषी अधिकारी कामठी, तालुका आरोग्य अधिकारी कामठी, पशुधन विकास अधिकारी कामठी, महिला व बाल विकास अधिकारी कामठी, विस्तार अधिकारी , गटशिक्षण अधीकारी पंचायत समिती कामठी, नायब तहसीलदार (महसूल),(संजय गांधी योजना),निरीक्षक अधिकारी पुरवठा विभाग कामठी, उपअभियंता महावितरण कार्यालय कामठी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कामठी, कोराडी मंडळातील सर्व बँकेचे शाखा अधिकारी, मंडळ अधिकारी कोराडी, पोलीस निरीक्षक कोराडी उपस्थित राहणार आहेत, हे सर्व विभागीय अधिकारी या उपक्रमात एकाच छताखाली उपस्थित होते. या एक दिवसीय उपक्रमात ५६३ अर्ज निकाली काढण्यात आले.

प्रशासन आपल्या गावी या उपक्रमात प्राप्त झालेल्या ६२८ प्रकरणापैकी ५६३ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून उर्वरित ६५ प्रकरणे काही कारणास्तव प्रलंबित आहेत. या उपक्रमात महसूलचे 73, निवडणूक विभागाचे 128, शिधापत्रिका आद्यवतीकरन 81, ग्रा प कडून 145 लाभार्थीना विविधप्रमानपत्रे वितरित, आधार नोंदणी 75, तालुका आरोग्य अधिकारी 117, महिला बालविकास विभाग 17 असे विविध प्रकरणे निकाली काढण्यात आले.

या उपक्रमाचा शुभारंभ आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादुला नगर पंचायत चे नगराध्यक्ष राजेश रंगारी, जि प सदस्य नाना कंभाले, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, प स सदस्य सविता जिचकार, कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले, उपसरपंच आशिष राऊत, सुरदेवी चे सरपंच सुनील दूधपचारे, लोनखैरी चे सरपंच लीलाधर भोयर, खसाळ्याचे सरपंच रवी राऊत, ग्राम विकास अधिकारी हरिभाऊ लोहे, मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. बचत गटाद्वारे निर्मित विविध उत्पादनाचे प्रदर्शन सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आले. आजच्या विशेष उपक्रमात महसूल, पुरवठा, भूमी ,अभिलेख कृषी ,आधार ,आरोग्य, महिला बालकल्याण, पशुधन आदी विभागातील विविध प्रकरणाचा निपटारा यावेळी करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल राऊत, पुरवठा अधिकारी अर्चना निमजे, नायब तहसीलदार एन एन गोडबोले ,नायब तहसीलदार राजीव बमनोटे, अमोल पौड, जयवर्धन महानाम, पद्माकर अगम, नितीन फुलझले, वृषाल सहजे, गोपिका विखे, मयूर धोटे ,अशोक कुथे, गौरव राऊत, गणेश टेकाम, ताराचंद जामगडे, प्रमोद बागडे, सुरेश रोडगे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तर पुढच्या शुक्रवारी 30 सप्टेंबर ला गुमथळा येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तेव्हा नागरिकांनी प्रशासन आपल्या गावी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com