नागपूर :-पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल ,नागपूर शहर यांनी दि २२/८/२०२४ रोजी सायं.६.३० वा मेडिकल व ७.१५ वा मेयो हॉस्पिटल येथील मार्डचे डॉक्टर यांचेशी संवाद साधला. दरम्यान पोलीस आयुक्त यांनी सोबत सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस उपायुक्त निमित गोयल परि. क्र. ३ ,सहायक पोलीस आयुक्त, विनायक कोते, अजनी विभाग, अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार यांच्यासह प्रत्यक्ष मेडिकल हॉस्पिटल येथे भेट दिली.
अ. मेडिकल हॉस्पिटल
मेडिकल हॉस्पिटलचे अधिष्ठाता राज गजभिये आणि मार्डचे संपकरी विद्यार्थी डॉक्टर हे यावेळी उपस्थित होते. संवाद दरम्यान पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, आमचे स्थानिक पोलीस अधिकारी हे नियमितपणे मेडिकल हॉस्पिटल येथे भेट देईल. विद्यार्थी डॉक्टर यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता व स्थानिक पोलीस अधिकारी यांची ओळख व्हावी याकरिता आम्ही सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी आलो आहे” असे सांगितले. सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी, CCTV द्वारे संशयास्पद हालचालींची नोंद घेतली जाईल. मेडिकल हॉस्पिटलचे सर्व क्षेत्रे CCTV द्वारे निगराणी खाली ठेवले जाईल. संशयास्पद हालचालींबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासली जाईल. मेडिकल बूथ येथील पोलीस अमलदार व MSF यांनी त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे पार करण्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाईल. मेडिकल हॉस्पिटलच्या महिला हॉस्टेल्स मधील सुरक्षा मेडिकल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी / प्रतिनिधींनी यांनी तपासली पाहिजे. अशा देखील सूचना पोलीस आयुक्त यांनी केल्यात.
पोलीस आयुक्त यांनी विशेष करून मुलींनी सावध राहावे आणि त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाची, व समाजकंटक यांची हालचालीवर लक्ष ठेवावे व सतर्क रहावे. याबाबत काही समस्या उद्भवल्यास लागलीच त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. अप्रिय घटनांची माहिती स्थानिक मेडिकल हॉस्पिटल व हॉस्टेलच्या जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्याला व पोलिसांना देखील ती त्वरित दिली पाहिजे. डॉक्टर विद्यार्थी यांना कोणतीही समस्या असेल तर आम्ही स्वतः संवाद साधण्यासाठी यापुढेही उपलब्ध आहे. तातडीने मदतीसाठी ११२ डायल करावे.
MSF कर्मचार्यांचे कार्य प्रणाली SOPs व पुनरावलोकनासाठी मीटिंग्स मेडिकल हॉस्पिटल येथे घेण्यात यावी. कॅम्पची सुरक्षा ऑडिट केली जावी. पार्किंग समस्यांचा निवारण करावे. फेरीवाले, हाथठेले, हॉकर्स अवैधरीत्या लावण्यात आलेली स्टॉल या सर्वांना NMC चे सहकार्याने काढून घेण्यात यावे. अशा कडक सूचना पोलीस आयुक्त यांनी सर्वांना केल्यात. तसेच या सूचनांचे पालन झाले किंवा नाही यासाठी पोलीस आयुक्त यांनी ते पुन्हा दोन-चार दिवसात या ठिकाणी परिसरात भेट देणार असे देखील आवर्जून सांगितले. मेडिकल हॉस्पिटल चा अंधारात येणाऱ्या परिसर या ठिकाणी लाईट लावण्यात यावे ज्यामुळे जाण्या-येण्याकरिता महिला विद्यार्थी यांना अडचण होणार नाही. इत्यादी सूचना मा.पोलीस आयुक्त यांनी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना केल्यात.
याप्रकारे मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी विद्यार्थी डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर पोलीस आयुक्त हे मेयो हॉस्पिटल या ठिकाणी, सह पोलीस आयुक्त अश्वति दोरजे व पोलीस उपायुक्त निमित गोयल परि क्र ३ व तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुवा व कोतवाली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्यासह रवाना झाले व मेयो हॉस्पिटल येथे भेट दिली.
ब . मेयो हॉस्पिटल
व सदर ठिकाणी अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण व मार्ड संपकरी विद्यार्थी हे उपस्थित होते. संवाद दरम्यान पोलीस आयुक्त यांनी नमूद केले की, कलकत्ता येथील घटना ही खरोखरच वाईट आहे. अशा प्रकारची घटना होऊ नये याकरिता आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मेयो हॉस्पिटल येथे देखील सेक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे. अंधारातील परिसर हा लाईट्स लावून प्रकाशित केला पाहिजे तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन केले पाहिजे. याकरिता मेयो हॉस्पिटल यांनी विशेष करून लक्ष द्यावे. मेयो हॉस्पिटल येथील मरचुरी रूम आणि मुलींचे हॉस्टेल हे एकाच वाटेवर असल्याकारणाने या ठिकाणी भविष्यात चुकीचा प्रकार घडू नये याकरिता आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच हॉस्पिटल व्यवस्थापनाने याबाबत पावले उचलून उपाययोजना केल्या पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असून मरचुरी या ठिकाणी समाजकंटक किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मृत्यू झाल्यास मरच्युरी रूम कडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती भेट देणारे यांच्या बाबतीत आपण शाश्वत अशी हमी देऊ शकत नाही की सदर व्यक्ती ही कशी आहे!! आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने सदर ठिकाणी गर्दी झाल्यास त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोखपणे तर लावत असतो परंतु तरी देखील मुलींनी या ठिकाणी मेयो हॉस्पिटलच्या या परिसरात काळजी घेणं गरजेचे आहे. पोलीस विभागातील पोलीस दीदी सदर परिसरामध्ये भेट देतात.आपल्याला काही अडचण आल्यास आपण त्यांना तक्रार करू शकतात. तसेच ११२ हा नंबर प्रत्येक विद्यार्थी यांच्याकडे असावा जेणेकरून मार्शल हे ६ मिनिटात आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी येतील. मेयो हॉस्पिटल येथून तहसील पोलीस स्टेशन जवळच असल्याकारणाने व या परिसरात पोलीस बंदोबस्त व बीट मार्शल पेट्रोलिंग सतत सुरू असल्याने आम्ही याबाबत काळजी घेतच आहोत. परंतु घटना घडल्यानंतर त्वरित प्रतिसाद देणे व पोलिसांना कळविणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आपल्याकडून पोलिसांना रिपोर्टिंग त्वरित होणं हे तितकेच महत्त्वाचे आहे असे देखील पोलीस आयुक्त यांनी आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला.
याप्रकारे पोलीस आयुक्त यांनी दोन्हीही ठिकाणी भेट देऊन दोन्हीही हॉस्पिटल येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांच्या व मार्डचे वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस आयुक्त यांनी हे देखील नमूद केले की, आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन आतील परिसरात ड्रग्ज व्यसनाधीन असलेल्यांची माहिती द्या. जर येथे मद्यपान करणारा स्टाफ व इतर कोणी असेल, तर त्याची माहिती द्या; आम्ही पोलिसांमध्ये केस नोंदवू. पोलीस विभागात आम्ही केस नोंदविल्या आहे त्याचप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या विभागात तसे करू शकता असे ठामपणे पोलीस आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना आश्वासित केले व आपण सर्वांनी एकत्र येऊन समस्येचे निराकरण करून व आम्ही तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहोत याप्रमाणे डॉक्टर विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त यांनी विश्वास दिला.