-सतीश कुमार, गडचिरोली
गडचिरोली – उपविभागीय पोलिस केंद्र सिरोंचा के अंतर्गत उप पोलिस ठाणे रेगुंठा येथे दि. 05/03/2022 पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक , अनुज तारे यांच्या संकल्पनेतुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली पोलिस दादलोरा खिडकी या योजने मार्फत उप पोलिस ठाणे रेगुंठा हद्दीतील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील कु. कल्याण तिरुपती दुर्गम वय 12 वर्ष रा चिकेला ता सिरोंचा जि गडचिरोली या मुलाचा अपघातामध्ये डोळ्यास इजा होऊन डोळा बाहेर आलेला होता परंतु सदर मुलाच्या आई वडिलांची घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्याने तो डोळा बाहेरच लोंबकळत होता पोलीस पेट्रोलिंग दरम्यान घेण्यात आलेल्या ग्राम भेटीदरम्यान सदर मुलाच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरिता प्रभारी अधिकारी विजय सानप यांनी हमी दिलेली होती तेव्हा नागरी कृती शाखा गडचिरोली यांच्या मुलाच्या सहकार्यातून सुदर मुलाचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरता ऑपरेशन रोशनी अंतर्गत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे पाठविण्यात आले होते परंतु सुदर मुलाच्या इजा झालेल्या डोळ्याच्या मागील बाजूस कॅन्सरच्या गाठी तयार झाल्याने सदर मुलाच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता व सदर मुलाच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरता चार लाख रुपये खर्च येईल असेही सांगण्यात आले होते परंतु नागरी कृती शाखा गडचिरोली पोलीस व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान आतून ऑपरेशन रोशनी अंतर्गत सदर मुलाचे यशस्वीरित्या डोळ्याचे ऑपरेशन करून डोळा काढून कॅन्सरच्या गाठी ही काढण्यात आलेले आहे सदर ऑपरेशन हे पूर्णता नागरी कृती शाखा, रोटरी क्लब व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने सदरचे ऑपरेशन हे फ्री मध्ये करण्यात आलेले आहेत सदर मुलाची आज रोजी तब्येत व्यवस्थित असून पुढील तीन महिने ही सदर मुलाच्या डोळ्याची काळजी घेण्यासंदर्भात हॉस्पिटलने सांगितले असल्याने पोलीस स्टेशन रेगुंठा त्यांच्या संपर्कात आहे तसेच आज पर्यंत एकूण 59 अंध लोकांवर ती ऑपरेशन रोशनी अंतर्गत यशस्वीरित्या उपचार करण्याकरिता पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून डोळ्यांवरती दवा उपचार करण्यात आलेला आहेत
सदर ऑपरेशन रोशनी अंतर्गत उप पोलीस ठाणे रेगुंठा पोलीस अंमलदार/4317/ विठ्ठल गजानन सातपुते व महिला पोलीस अंमलदार/4485/कु.शितल गंगावणे तसेच या अगोदर महिला पोलीस अंमलदार/6010/रोहिणी गोटे व पोलीस अंमलदार/4166/सुरेंद्र भगत असे पोलीस अंमलदार सदर ऑपरेशन रोशनी अंतर्गत सहभागी होऊन ऑपरेशन रोशनी अंतर्गत मदत केली आहे तसेच या अगोदर उप पोलिस स्टेशन रेगुंठाचे प्रभारी अधिकारी विजय द सानप , पोलीस उप निरीक्षक सागर पाटील निजाम सय्यद यांचेही अतिशय मोलाची मदत लाभलेली आहे|