– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई
अरोली :- पोस्टे अरोली येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोस्टे अरोली हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपीमध्ये काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशा खात्रीशीर माहिती वरून पोस्टे अरोली हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपीमध्ये जुगार अड्डयावर रेड केली असता यातील आरोपी नामे-१) सुधीर ढोलबा ठोबरे वय ३५ वर्ष, २) उमेश सुर्यभान कोटरूगे वय ४५ वर्ष ३) विष्णु कवड्डु मोहुरले वय ३५ वर्ष ४) प्रशांत रामु मांडाळे वय २९ वर्ष ५) घुमेश सुभाष मसराम वय २९ वर्ष वरील सर्व रा. कोदामेंढी ६) अनिल मोहन मोहने वय ४५ वर्ष, रा. वाघबोडी ७) फरार संदीप नंदलाल कुंभरे ८) फरार फिरोज पठाण ९) फरार दिनेश बावणकुळे तिन्ही रा. कोदामेंढी ता. मौदा हे हारजितचा जुगार खेळ खेळतांनी मिळुन आल्याने आरोपीतांकडुन नगदी ३९००/- रू. तसेच घटनास्थळावरील व पाच ५२ तास पत्ते प्रत्येकी किंमती ५०/- रू प्रमाणे २५०/- रू व एकुण ०५ मोटार सायकल किंमती २१५०००/- रू असा एकुण २१९१५० /- रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरूद्ध पोस्टे अरोली येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे अरोली येथील ठाणेदार सपोनि निशांत फुलेकर, पोलीस उपनिरीक्षक सुशिलकुमार सोनवणे, पोहवा संदीप बाजनघाटे, शाम पोकळे, पी अं. राकेश राउत, विक्की कोथरे, मनीश सुखदेवे, चालक नितेश देवांगन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक कार्यालय स्टाफ पोना अनिल सपाटे, पोशि सचिन गेडाम यांनी केली.