गुन्हेशाखा अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाची कामगिरी 

नागपूर :- पोलीस ठाणे खापा, नागपूर ग्रामीण हद्दीत राहणाऱ्या ४० वर्षीय फिर्यादी, यांचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आपले घरून आजीकडे सदर नागपूर येथे आलेला होता. दिनांक १८.०५.२०२४ ये सकाळी ०८.३० वा. तो आजीचे घरी गावाला जातो असे सांगुन निघुन गेला. परंतु तो आपले आजीचे घरी गावाला पोहचला नाही. त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून पो. ठाणे मानकापूर येथे कलम ३६३. भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वरील गुन्हयातील अपहृत मुलाचा शोधकामी अनै.मा.वा.प्रति. पथकाने तांत्रीक पध्दतीने शोध घेवुन खात्रीशीर माहितीवरून अपहृत मुलगा बुट्टीबोरी समोरील अमूसर ढाबा येथे मिळून आल्याने, त्यास ताब्यात घेवुन विचारपुस करून त्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलास पो. ठाणे मानकापूर येथे पुढील कायदेशीर कार्यवाही कामी सोपविण्यात आले आहे.

वरील गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा, मपोनि ललीता तोडासे, सफौ. गजेन्द्र ठाकुर, राजेन्द्र अरकाडे, पोहवा. दिपक बिंदाने, सुनिल वाकडे, श्याम अंगुठलेवार, विलास चिंचुलकर, पोअं. शरीफ शेख, ऋषीकेश डुमरे, नरेश सिंगणे, मपोअं, वैशाली किनेकर, अश्विनी खोडपेवार यांनी केली,

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हद्दपार आरोपीस अटक

Fri May 24 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहीती मिळाली की धम्मदिप बुध्द विहारा जवळ, सार्वजनीक रोडवर हद्दपार ईसम नामे अनिकेत उर्फ अन्नू काल्या हा फिरत आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता तेथे आरोपी नामे अनिकेत उर्फ अन्नू काल्या जगदीश बडोदे, वय २४ वर्ष, रा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com