भाजपचे लोक आता जाणूनबुजून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत – जयंत पाटील

चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र शब्दात निषेध…

मुंबई  :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजपचे लोक आता जाणूनबुजून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.

महात्मा फुले हे उद्योजक देखील होते. त्यांनी उभी केलेली रचनात्मक सामाजिक कामे ही स्वतःच्या कष्टाच्या पैशातून केलेली आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विधिज्ञ, पत्रकार व प्राध्यापक होते.बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यावेळी ते केंद्रीय मजूर मंत्री होते याची आठवण जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना करुन दिली आहे.

राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ’फुले – आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या’ हे विधान करणे अत्यंत चुकीचे तर आहेच पण महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला ‘भीक’ मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा जाणूनबुजून केलेला अपमानच आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर

Sat Dec 10 , 2022
पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार लोकार्पण समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com