– रहिवाश्यांच्या सौंरक्षणार्थ तात्काळ पोलिस चौकी पुनर्स्थापित करावी – मनसे ची पोलिस आयुक्तांकडे आग्रही मागणी.
नागपुर :- पारडी प्रभाग हा मोठ्या प्रमाणात स्लम भाग असून येथे वास्तव्यास असणाऱ्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे, निमवर्गीय रहिवासी जनतेची संख्या ही येथे मोठ्या प्रमाणात असून येथील बहुतांश नागरिक नित्यारोज मजुरी करून आपले जीवन भागवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पारडी प्रभाग हा गुन्हेगारांचा अड्डा बनला असून पोलिस प्रशासनाचे ह्या भागात होत असलेल्या दुर्लक्ष्यामुळे असामाजिक व बाल गुन्हेगारी तत्वांद्वारे पारडी भागात दहशत निर्माण झाली असून त्यांच्या समाजविघातक कृत्यामुळे प्रभागातील महिला भगिनी व कामगार वर्ग प्रचंड दहशतीत रहात आहेत.
रहिवासींद्वारे सदर गंभीर परिस्थितीची तक्रार प्राप्त होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्या नेतृत्वात तसेच शहर सचिव महेश जोशी, श्याम पूनियानी, घनश्याम निखाडे व रजनीकांत जिचकार यांच्या प्रमुख उपस्थिती पूर्व विधानसभा अध्यक्ष उमेश उतखेडे यांनी वसाहतीतील अंदाजे १२५ ते १५० माता भगिनींसह नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार (आयपीएस) यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे परिस्थितीचे गांभीर्य नमूद केले.
पोलिस आयुक्तांशी झालेल्या विस्तृत चर्चे दरम्यान पारडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागेश्वर नगर, अंबे नगर, राणी सती सोसायटी ह्या परिसरात विविध गुन्हेगारी कायद्यातील कलमांद्वारे अनेक केसेस दाखल असलेले सराईत गुन्हेगार दिवसाढवळ्या तलवारी, चाकू, सुरे इत्यादी घातक शस्त्र घेवून वसाहतीत दहशत निर्माण करत महिला भगिनींची छेड काढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वसाहतीतील महिलांनी त्यांच्या व त्यांच्या घरातील लहान मुलांच्या तसेच आया बहिणींच्या सौरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून स्थानिक पोलिस प्रशासन गुन्हेगारांकडून आर्थिक व्यवहार करून थातूरमातूर नोंद करते व गुन्हेगारांना सोडून देते याचा अर्थ काय समजायचा? जनतेनी पोलिस प्रशासन विश्वास कस ठेवायचा? असा संतप्त सवाल केला. तेच गुन्हेगार सुटल्यावर मोकाट होऊन आया बहिणींची अब्रू लुटायचा प्रयत्न करतात असे उपस्थित स्थानिक रहिवाशांकडून पोलिस आयुक्तांना सांगण्यात आले.
गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा, विभागात पोलिस प्रशासनाची दहशत निर्माण व्हावी तसेच रहिवाशांमध्ये पोलिस प्रशासनेबाबत विश्वास निर्माण व्हावा ह्यासाठी पारडी विभागात पूर्वी असलेली परंतु काही वर्षांपूर्वी काढण्यात आलेली पोलिस चौकी तात्काळ पुनर्स्थापित करण्यात यावी तसेच परिसरात पोलिस विभागाच्या फ्लाईंग स्काड द्वारे नियमित गस्त देण्यात यावी अशी मागणी मनसे शिष्ठ मंडळाने पोलिस आयुक्तांकडे केली. वसंतराव नाईक वसाहतीत घडलेल्या अप्रिय घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पारडी परिसरातील रहिवाश्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून पोलिस चौकीची मागणी तात्काळ मान्य करण्यात यावी व गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत व मार्गदर्शनात अचानक झडती सत्र राबऊन गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात याव्यात असे सुचविण्यात आले.
मनसे च्या निवेदनात सुरक्षेबाबत नमूद गंभीर मुद्दे, विषयाचे गांभीर्य व अप्रिय घटनेची पुनरावृत्ती टाळावी ह्या उद्देशाने पोलिस आयुक्त यांनी संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाना पाचारण करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सदर आदेशाचे तंतोतंत पालन करत तात्काळ शोध मोहीम राबवून परिसराची झडती कारवाई करण्यात आली.
मनसे पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात परिसरातील अंदाजे १२५ ते १५० महिला माता भगिनी व पुरुष नागरिक यांचेसह नागपुर शहर अध्यक्ष विशाल बडगे, चंदू लाडे, शहर सचिव महेश जोशी, श्याम पुनयानी, घनश्याम निखाडे, रंजनीकांत जिचकार, पूर्व नागपुर विभाग अध्यक्ष उमेश उतखेडे, दक्षिण नागपुर विभाग अध्यक्ष अंकित झाडे, पश्चिम नागपुर विभाग अध्यक्ष अभिषेक माहुरे, महिला सेनेच्या पूर्व नागपुर विभाग अध्यक्षा कोमल बुरघाटे, दक्षिण विभाग अध्यक्क्षा स्नेहा खोब्रागडे, उपाध्यक्ष प्रतिभा बालपांडे, पूर्व नागपुर सचिव अक्षय बिलवने, सहसचिव तात्या भगत, निखिल जांगडे, उपाध्यक्ष अतुल कोरे, कुणाल तिडके, मोहन महल्ले, शाखा अध्यक्ष भरत येनूरकर, चैतन्य कळंबे, विशाल सलगंटवार,भूषण ढोबळे, पश्चिम विभाग उपाध्यक्ष पराग विरखरे, उत्तर विभाग सचिव शैलेश बातूलवार, जगदीश इंगोले, अभिषेक डे व मोठ्या संख्येत महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
@ फाईल फोटो