चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेची सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा येथे “सतर्कता जागरूकता सप्ताह” अंतर्गत एमईएल चंद्रपूर तर्फे चित्रकला तथा निबंध स्पर्धा घेण्यात आली.
विकसित देशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत या विषयावर वर्ग 8 ते 10 वीच्या मुलांनी निबंध स्पर्धेत तर वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. सदर कार्यक्रमाला एमईएल चंद्रपूरचे जीएम राजशेखर, कटरे, ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक नागेश नित उपस्थित होते. राजशेखर यांनी शाळेतील प्रगती पाहून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला तसेच यापुढेही शाळेला यथोचित मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदर चित्रकला आणि निबंध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. एमईएल चंद्रपूरच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना फुड पॅकेट्स देण्यात आले आणि हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.