पद्मश्री पुरस्कार हा निःस्वार्थ सेवेची पावती – नितीन गडकरी

– डॅा. चंद्रशेखर मेश्राम, डॅा. संदीप चौधरी यांच्या सेवाकार्याचा गौरव

नागपूर :- निःस्वार्थ व समर्पित भावनेने गोगरिब रुग्णांची सेवा करताना सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य डॅा. चंद्रशेखर मेश्राम, डॅा. संजीव चौधरी तसेच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केले आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना हे कार्य यापुढेही कायम सुरू राहील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातील अधिकारी, आदिवासी वैद्यकीय संघटना तसेच ट्रायबल इंडियन चेंबर आफ कॅामर्स आदी संघटनांतर्फे विदर्भातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. प्राईड आफ इंडिया या सन्मानाबद्दल डॅा. संजीव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे होत्या. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे , माजी महापौर माया  इनवाते, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, माजी आमदार पारवे, विलास राऊळकर, अरुण पवार, आर.डी.आत्राम, उपायुक्त दशरथ कुळमेथे, डॅा. पुरुषोत्तम मडावी, नयन कांबळे, विदर्भ प्रदेश प्रमुख दीपक मडावी उपस्थित होते.

निःस्वार्थ व समर्पित भावनेने काम करतानाच व्यावसायिकतेला प्राधान्य न दिल्यामुळे समाजातील गोगरिब रुग्णांची अविरतपणे सेवा करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राज्याचा व देशाचा गौरव वाढविल्याबद्दल डॅा. चंद्रशेखर मेश्राम व डॅा. संजीव चौधरी यांचा विशेष गौरव करताना श्री. गडकरी म्हणाले की, समाजासाठी आदर्श असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी त्यांचा सेवाप्रकल्प अविरत सुरू राहावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पद्यश्री पुरस्काराबद्दल डॅा. चंद्रेशखर मेश्राम तसेच प्राईड आफ इंडिया या सन्मानाबद्दल डॅा. सजीव चौधरी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

पहिला आदिवासी आरोग्य परिषद जानेवारीत

ग्रामीण भागातील महिलांमध्ये हाडांचे आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या आजाराबद्दल महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर असलेल्या औषधांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यामुळे अशा महिलांवर उपचार व संशोधन करण्यात येत असल्याची माहिती डॅा. संजीव चौधरी यांनी दिली.

नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सुमारे आठ हजार 792 महिलांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासात आढळून आलेल्या निरीक्षणानुसार आजारांची विभागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आला असून तो राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात येत्या जानेवारीत नागपूर येथे पहिली जागतिक आदिवासी आरोग्य परिषद आयोजित करणार असल्याची माहिती डॅा. संजीव चौधरी यांनी दिली.

मेंदू विकारतज्ज्ञ डॅा. चंद्रशेखर मेश्रामांनी मेंदूंचे आरोग्य कसे जपावे यासाठी मोठ्या प्रमाणात जागरुकता करणे आवश्यक आहे. यासंदर्भात एक लाख लोकांची तपासणी व संशोधन करण्यात येणार असून यामधून मेंदूच्या आजारांच्या संदर्भातील शोध घेण्यात येणार आहे. मेंदूंचे आजार प्रामुख्याने धूम्रपान, तंबाखू व मद्यसेवनाने होत असल्याचे निरीक्षण असून यावर बंदी घातल्यास हा आजार निश्चितच कमी होऊ शकेल, असा विश्वास डॅा. मेश्राम यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आभार दशरथ कुळमेथे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकप्रशासन विभागात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन

Sun Mar 10 , 2024
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य शासन विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी,विभागप्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विकास जांभूळकर विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. महिला दिन हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights