पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी (कवठा)म्हसाळा ग्रा प चे प्रभारी सरपंच अपात्र घोषित

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 16 :- 26 सप्टेंबर 2018 ला झालेल्या ग्रा प सार्वत्रिक निवडणुकीत (कवठा)म्हसाळा 12 सदस्यीय ग्रा प मध्ये सरपंच पदी अनिता धर्मराज आहाके तर उपसरपंच पदी शरद माकडे निवडून आले होते .दरम्यान गावातील शासकीय पांधण रस्त्यावर अवैधरित्या अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरनी 20 फेब्रुवारी 2019 ला सरपंच अनिता आहाके व सदस्य (सरपंच पती)धर्मराज आहाके हे अपात्र घोषित झाल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेवर उपसरपंच शरद माकडे यांनी प्रभारी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.दरम्यान प्रभारी सरपंच शरद माकडे यांनी पाणी टँचाई संदर्भात खाजगी पाण्याचे टँकर लावण्याकरिता दरपत्रक (ई निविदा)प्रणालीचा अवलंब न करता आपल्या सख्या मोठा भाऊ भैय्यालाल माकडे च्या खाजगी टँकर ला पाणी पुरवठा करण्याबाबत मान्यता दिली . व 7 मे 2019 ते 30 जुलै 2019 पर्यंत प्रतो दिवस 4 फेऱ्या (चार हजार लिटर पाणी)गावात पाणी पुरवठा केल्याप्रकरणी 5 लक्ष 09 हजार 780 रुपये अदा करण्यात आले. तर शासकीय अनुदान जमा होण्यापूर्वीच पाणी टंचाई च्या नावावर ग्रा प स्वनिधीतून निधी खर्च करण्यात आला यावरुन सरपंच शरद सूर्यभान माकडे यांनी पदाचा दुरुपयोग करून त्यांचे आपल्या भागीदार मार्फत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भाग किंवा हितसंबंध दिसून येत असल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी ग्रा प सदस्य व प्रभारी सरपंच शरद सूर्यभान माकडे यांना महाराष्ट्र ग्रा प अधिनियम 1958 चे कलम 14(1)(ग)कलम 16 अनव्ये अपात्र घोषित केले.
सन 2018-19मध्ये ग्रा प (कवठा)म्हसाळा क्षेत्रात पाणी टंचाई असल्यामुळे खाजगी पाण्याचे टँकर लावण्याच्या निविदाबाबत मासिक सभेत ठराव पारित करण्यात आला.त्यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी टँकर लावण्यासाठी दरपत्रक(ई निविदा)चा अवलंब न करता आपल्या सकख्या मोठ्या भावाला भैय्यालाल सूर्यभान माकडे ला पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती कामठी ला सादर केले तसेच भैय्यालाल सूर्यभान माकडे हे सरपंच चे मोठे भाऊ असल्याचे सांगण्यात आले नाही तसेच त्यांचे खाजगी टँकर एम एच 40 एल 8073 व ट्रॉली क्र एम एच 40 एल 6039 ने 30 जून 2019 पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे परवानगी देत शासकीय अनुदान जमा होण्यापूर्वीच एका फेरीची रक्कम 1080 रुपये ग्रा प स्वनिधीतून खर्च केले आहे .तसेच 472 फेऱ्यनुसार 5 लक्ष 9 हजार 780 रुपयाचे बिल अदा करण्यात आले आहे.यासंदर्भात कोर्ट विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत अप्पर जिल्हाधिकारो शिरीष पांडे यांनी प्रभारी सरपंच शरद माकडे ला अपात्र घोषित केले.या प्रकरणात अर्जदार निलेश डफरे च्या वतीने अधिवक्ता भोजराज धंदाळे व गैरअर्जदार प्रभारी सरपंच शरद माकडे च्या वतीने अधिवक्ता श्रीरंग भोंगाडे यांनी युक्तिवाद केला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत यांची निवड

Thu Mar 17 , 2022
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक  ५ लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत यांची आज प्रदेशाध्यक्ष पदी निवड घोषित करण्यात आली. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी  जारी केलेल्या पत्राद्वारे राऊत यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यामुळे काँग्रेसमध्ये राज्यभरात आणि नागपुरात आनंदाचे […]
kunal raut

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com