मालकी हक्काचे पट्टे, ग्रामस्थांना खासदार तुमाने यांचा दिलासा

नागपूर :- रामटेक लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील नागपूर वर्धा रोडवरील डोंगरगाव ग्रामपंचायत अंतर्गत टेकडी धुटी गावातील शेकडो ग्रामस्थांनी आज खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयात धाव घेतली. शासन निर्णयानुसार मालकी हक्क पट्टे वाटपाचा प्रश्न लवकर निकाली काढण्याचे निर्देश तहसीलदारांना देत खा. कृपाल तुमाने यांनी या ग्रामस्थांना दिलासा दिला. डोंगरगाव ग्रामपंचायत अंतर्गत धुटी गाव येथे गेल्या 30 वर्षापासून आम्ही राहत असून घरोघरी पाणीपुरवठा , वीज व पुरवठा केला जात आहे. टॅक्स लागलेला आहे. परिसरात मैदान, समाज मंदिर, शौचालय सर्व शासन सुविधा मिळालेल्या आहेत असे असताना ही जागा खसरा क्रमांक 26/1 राज्य शासनातर्फे केंद्रीय विद्युत अनुसंधान केंद्राला 30 वर्षाच्या लीजवर देण्यात आली. अनुसंधान केंद्राने मोजमाप करून वॉल कंपाऊंड टाकली. केंद्रीय विद्युत अनुसंधान केंद्राने झोपडपट्टी धारकांसाठी सोडलेल्या जमिनीचे मालकी हक्क पट्टे आम्हाला मिळावेत अशी मागणी या ग्रामस्थांनी केली. अखेरीस ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेत खासदार कृपाल तुमाने यांनी स्वतः कार्यालयाबाहेर जाऊन धुटी गाव झोपडपट्टी बचाव कृती समितीचे निवेदना स्वीकारले. समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण घुमेकर यांनी ग्रामस्थांच्या अडचणी सांगितल्या. या ग्रामस्थांना पट्टे वाटप लवकरात लवकर करावे असे निर्देश नागपूर ग्रामीणचे तहसीलदार वानखेडे यांना देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ थोरात, अमित कातुरे यांच्यासह सर्वश्री सुखचंद नागपुरे, सपना तांबे, सुनील उईके, अनिल कांबळे, विलास ठाकरे ,संतोष वर्मा, नंदकुमार धर्मगुडीया, छोटू उईके, महादेव निषाद, पुरुषोत्तम खरात, दशरथ कुडमथे, नरेंद्र कटवते, जितेंद्र मलिक, हिरासिंग दुलार, माया कटरे, माया दुलारे, गिरधारी चौरागडे, बिरचंद आचरे, माया रौतेल आदी अनेकजण हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IT में अगले साल भारी भर्तियां

Mon Dec 19 , 2022
नागपुर :-स्टाफिंग और भर्ती सेवा कंपनी रैंडस्टैड ने गुरुवार को बताया कि दुनियाभर में बढ़ती छंटनी और भर्तियां रुकने के बावजूद भारत में स्थिर भौगोलिक, आर्थिक और राजनीतिक स्थिति के कारण 2023 में तकनीकी कंपनियां भारी भर्ती करने वाली है। रैंडस्टैंड इंडिया के प्रोफेशनल सर्च ऐंड सेलेक्शन ऐंड स्ट्रैटजिक अकाउंट मैनेजमेंट के निदेशक संजय शेट्टी ने कहा, ‘हालांकि लागत भी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com