नागपूर :- प्रभाग क्र 28 मधील सर्व जेष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार दिघोरी ते गांधीबाग इलेक्ट्रिक बसच्या शुभारंभाचा सोहळा दिघोरी चौकात माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून संपन्न करण्यात आला असून आज पासून दिघोरी परिसरातील नागरिकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने AC इलेक्ट्रिक बस ची सुरुवात झाली आहे.
दिघोरी, ताजबाग, सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी, महाल झेंडा चौक बडकस चौक गांधीबाग असा बस चा प्रवास असेल. या शुभारंभा प्रसंगी प्रभागातील सुरेश सवाई, मधू राऊत, अनंता बाविस्कर, गजेंद्र मोहाडीकर, मंगेश डोरले, अशितोष रग्गड, राहुल ढोबळे, जया बानाईत, सुरेश धनजोडे, संभाजी गायकवाड, रामचंद्र बोडखे, अंजनकर, हटवार, शेंडे, विनोद इंगळे, मोरेश्वर वंजारी, रमेश डहाके इत्यादी नागरिक उपस्थित होते.