संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जमीन तयार केली आहे.परंतु पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी राजा निराश होऊन पावसाच्या प्रतीक्षेत बसला आहे.त्यामुळे कामठी तालुक्यातील येरखेडा गावात मेघराजाची गावपूजा करून धोंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
कामठी तालुक्यातील बळीराजाने जमिनीची मशागत करून पेरणीसाठी सुसज्ज करून ठेवली आहे.परंतु ऐन पेरणीच्या वेळेस पाऊस नाराज होऊन बसला आहे.तेव्हा पावसाची नाराजी दूर करण्यासाठी जुन्या प्रथेप्रमाणे धोंडी मागण्याची प्रथा ला कायम ठेवत येरखेड्यात धोंडी धोंडी पाणी दे चा नारा लावत गावपूजा करण्यात आली.यावेळी कडू निंबाचे पानाचे पत्ते तोडुन कपडे सारखे अंगावर परिधान करून धोंडीची दिंडी काढण्यात आली .यावेळी ‘धोंडी धोंडी पाणी दे, गाय वासराला चारा दे,धोंडी धोंडी पाणी दे ,शेतकऱ्यांचे कर्ज फिटू दे असे सुसंस्कृत गीत गाऊन पावसाची मागणी करीत दिंडी काढण्यात आली.या धोंडी दिंडीतून लवकरच मान्सूनचे आगमन होवो आणि शेतकऱ्यांचे निराशा दूर होऊन लवकर पेरणी शेतकऱ्यांची चालू होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.तेलीपुरा येरखेडा येथे गावपुजा करण्यात आली
या गावपूजेत दादू भस्मे, गजानन तिरपुडे, रजत वाडीभसमे, अंकीत पाहुणे, शुभम बागाईतकर , हर्षल पोटभरे,सुरज नाटकर, रितीक डोंगरे, रोहीत थोटे, भीमराव वंजारी, लक्ष्मण मेषराम, मनोहर वाडीभसमे, चंदु साठवने,जया भस्मे, वनिता नाटकर, कलाबाई नाटकर, कलाबाई गवते आदी उपस्थित होते.