ओव्हरलोड वाळू वाहतुकदारावर कार्यवाही

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 2:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा जवळील आर आर कंपनीजवळ उभे असलेल्या ओव्हरलोड वाळू वाहतूकदारावर रात्रगस्तीवर असलेल्या महसूल पथकाने कारवाही करीत वाळू ने भरलेले सदर दोन्ही ओव्हरलोड ट्रक पुढील कार्यवाहिस्त्व मौदा पोलीस स्टेशन ला ठेवण्यात आले.ही कारवाही गतरात्री 2 वाजता केली असून या कार्यवाहितुन 6 ब्रास ओव्हरलोड वाळू जप्त करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार सदर घटनास्थळी ट्रक क्र एम एच 40 बि एल 1533 व एम एच 40 बी एफ 1533 मध्ये 3 ब्रास वाळू वाहतुकीची रायल्टी असून या ट्रक मध्ये 3 ब्रास अधिकची वाळू भरलेली होती .दरम्यान गस्तीवर असलेल्या महसूल पथकाने सदर दोन्ही ओव्हरलोड ट्रक मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.तर या कार्यवाहितुन जप्त दोन्ही ट्रक मधून 6 ब्रास ओव्हरलोड वाळू जप्त करण्यात आली.ही यशस्वी कारवाही तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार अमर हांडा, मंडळ अधिकारी जयवर्धन महानाम, तलाठी एन बी कोहळे, एन डी फुलझेले, पी पी अगम, वाहनचालक युवराज चौधरी यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com