संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1 :-सेठ केसरीवाल पोरवाल महाविद्यालयात राष्ट्रीय,राज्यस्तरीय आणि विद्यापीठ स्तरीय खेळात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा पुरस्कारांचे वितरण दिनांक 2 सप्टेंबर 2022 ला सकाळी 10 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात प्रामुख्याने 2020 -21 व 2021- 22 ह्या वर्षांमध्ये होतकरू विद्यार्थ्यांनी जे पुरस्कार महाविद्यालयासाठी मिळवून दिले त्यांचा सत्कार आणि त्यांना पारितोषिक महाविद्यालयातर्फे देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोक कुमारजी भाटिया हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.विजयजी बोरसे माजी विभागप्रमुख हिस्लॉप महाविद्यालय नागपूर हे उपस्थित राहणार आहे. ह्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी उपप्राचार्य डॉ.मनीष चक्रवर्ती, हेही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रशांत बांबल, डॉ. जयंत रामटेके , डॉ.इंद्रजीत बसु, प्रा. मल्लिका नागपुरे सह महाविद्यालयातील इतर विभागातील प्राध्यापकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. त्यात डॉ. नितीन मेश्राम, डॉ. आलोक रॉय, डॉ. विनोद शेंडे, डॉ. आशा रामटेके. डॉ. शालिनी चहांदे प्रो.मोहम्मद असरार डॉ. महेश जोगी डॉ. विकास कामडी डॉ. मंजिरी नागमोते, डॉ. प्रियांका भोयर, श्री.महेश ईरपाते यांनी ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहे.तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रशांत बांबल यांनी केले आहे.