भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

गडचिरोली :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 29 मे 2023 ते 07 जून 2023 या कालावधीत SSB कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी अपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 25 मे 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Facebook पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करुन त्यामधील SSB-53 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन यावे. केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे

कम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी. ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एन.सी.सी. ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी – pctcoic@yahoo.in व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

महाराणा प्रताप सिंग जयंती निमित्त़ विनम्र म.न.पा. तर्फे अभिवादन

Mon May 22 , 2023
नागपूर :- नागपूर महानगर पालिकेच्या वतीने मुघल साम्राज्यच्या विरोधात लढा देणारे, शौर्य व स्वाभिमानाचे प्रतिक महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पित करून अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त रवींद्र भेलावे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, बाजार विभागाचे अधीक्षक प्रमोद वानखेडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com