नागपूर :- दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी हुडकेश्वर पोलीस स्टेशन, हुडकेश्वर रोड नागपूर. येथे डिजिटल ग्रामीण सेवांचा ऑनलाईन कॅम्प उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभा (हेल्थ) कार्ड तयार करण्याचे कॅम्पद्वारे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर लाभल्या होत्या, त्याच प्रमाणे सिद्धेश्वर कोमजवार समाजिक कार्यकर्ता, दीपक काळे स्टेट कॉर्डिंटर, डॉ. स्वाती फुसे माधव बाग, जय साखरे रिजिनल कॉर्डिंटर, प्रशांत चौधरी नागपूर जिल्हा कॉर्डिनेटर, रविकिरण समर्थ गडचिरोली जिल्हा प्रमुख, विजय केवट भंडारा जिल्हा प्रमुख, त्याच प्रमाणे विद्याताई सेलूकर समाजिक कार्यकर्त्या, राजेंद्र पाठक मीडिया पोलीस टाइम्स 24, रवींद्र भिसीकर, डॉ. श्रीकांत बानाबाकोडे चा आणि सतीश गद्रे जिल्हा कॉर्डिनेटर, त्याच प्रमाणे प्रकल्पतील नागपूर जिल्ह्यातील सर्व ब्लॉक कॉर्डिनेटर आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात Digital Gramin Seva अंतर्गत एकूण 60 च्या वर अधिकारी व कर्मचारी यांचे कार्ड तयार करून देण्यात आले.
Digital Gramin Seva अंतर्गत ऑनलाईन आधार कार्ड कॅम्पचे आयोजन.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com