गडचिरोली :- गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत काम करणाया युवक-युवती तसेच पोलीस अंमलदारांसाठी VLE ची एक दिवसीय कार्यशाळा दि. 15/10/2022 रोजी पार पाडण्यात आली.
सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षणासाठी 120 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना अॅप बाबत माहिती देण्यात आली. सदर अॅपच्या माहितीमुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत बँक सेवा, जात प्रमाणपत्र, पीक विमा, पंतप्रधान विमा योजना, ई-श्रम कार्ड, पेंशन सर्विस, इन्शुरंस या सारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करून देण्यासाठी सोईचे होणार आहे. यावेळी माहे- ऑगस्ट व सप्टेंबर 2022 मधील VLE चे उत्कृष्ट काम करणाया युवक- युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 512, नर्सिंग असिस्टंट 1143, हॉस्पीटॅलीटी 314, ऑटोमोबाईल 276, इलेक्ट्रीशिअन 167, प्लंम्बींग 35, वेल्डींग 38, जनरल डयुटी असिस्टंट 314, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई 52, सेल्समॅन 4 असे एकुण 2866 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 140 मत्स्यपालन 87 कुक्कुटपालन 504, बदक पालन 100, वराहपालन 10, शेळीपालन 80, शिवणकला 222, मधुमक्षिका पालन 32, फोटोग्राफी 65, भाजीपाला लागवड 525 , पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 880, टु व्हिलर दुरुस्ती 64 , फास्ट फुड 65, पापड लोणचे 30, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 502, एमएससीआयटी 200, कराटे प्रशिक्षण 48 असे एकुण 3554 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. तसेच कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट मॅनेजर (csc) गडचिरोली, आकाश खोडवे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर (csc) गडचिरोली, विशाल कुंभाळकर हे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पो.उप. नि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.