मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नागपूर : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना सन 2022-23 वर्षात महाडीबीटी या पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज भरण्याकरीता 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरून घ्यावे तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गाचे अर्ज तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरीता सादर करावे. अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. २२२१०४१. ईमेल- sdswo.nagpur@gmail.com किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, नागपूर येथे संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रिकेटपटू केदार जाधव वर शिस्तभंगाची कारवाई करा - हेमंत पाटील

Sat Jan 21 , 2023
मुंबई :- कौटुंबिक कारण देत मध्येच सामना सोडून जाणाऱ्या क्रिकेटपटू केदार जाधव वर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शनिवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली.जाधव संदर्भात बीसीआयकडे तक्रार करणार असल्याचे देखील पाटील म्हणाले.खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याने सामना समितीच्या नियमानुसार तसेच खेळाडूवृत्तीने वागले पाहिजे.अन्यथा क्रिकेट सोडून घरी बसावे, असा सूचक सल्ला पाटील यांनी केदार जाधवला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights