अहमदनगर :- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने ,“राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023” निमित्त मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर शहरातील माऊली सांस्कृतिक सभागृह, न्यू टिळक रोड येथे दिनांक 22 ते 24 सप्टेंबर 2023 दरम्यान करण्यात आले असून हे प्रदर्शन सर्व जनतेसाठी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन तर 2023 हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणूण साजरे करण्याची घोषणा केली.दरवर्षी सप्टेंबरचा महिना भारतात राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जातो. निरोगी जीवनशैली राखण्यासाठी निरोगी खाण्याच्या सवयी आणि योग्य पोषणाचे महत्त्व याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आणणे हा या राष्ट्रीय पोषण माह चा उद्देश आहे.पौष्टीक तृनधान्याचे आहारातील महत्व, या धान्यांपासून तयार करण्यात येणारे चविष्ट पदार्थ आणि विविध आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी यात धान्यांमध्ये असलेल्या सत्वगुणांची माहिती या मल्टिमीडिया प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी,नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटकी ,सावा, कूट्टु व राजगिरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या भरडधान्यांना सुपरफूड व श्री अन्न असेही म्हटले जाते.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने सांसकृतिक कार्यक्रम, पोषण आहारांचे प्रदर्शन व विक्रीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीन स्टॉल्स लावण्यात येणारे आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना (शहरी) यांच्या वतीने सकस आहाराचे प्रदर्शन भरविण्यात येणास आहे. .तृणधान्य व पाक कलेंची माहिती देण्यासाठी एलईडी स्क्रीन द्वारेही माहिती देण्यात येणार आहे.
दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ११ वाजता या तीन दिवशीय मल्टिमिडिया प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी अमोल महाजन, महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)चे सहायक प्रकल्प संचालक सोमनाथ जगताप, बालविकास प्रकल्प अधिकारी(शहर)
खासदार सदाशिव लोखंडे. आमदार लहू कानडे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्शिल सदस्या मीनाताई जगधने, उपविभागीय अधिकारी किरन सावंत, अपर पोलीस अधिक्षक स्वाची भोर, तहसीलदार वाघचौरे, गटविकास अधिकारी प्रविण शिनारे, तालूका कृषी अधिकारी अशोक साळी, माहिती अधिकारी सुरेश पाटील, बचत गट प्रमूख गायकवाड, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन तथा प्राचार्य सुनिल साळवे, सामाजिक कार्यकर्ते अरुण नाईक आदी मान्यवर यावे उपस्थित राहतील अशी माहिती माहिती प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व सहायक प्रचार अधिकारी पी. कुमार यांनी दिली.या कार्यक्रचा लाभ सर्व जनतेनी घ्यावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.