कामठी :- कामठी तालुक्यातील न्यूयेरखेडा येथे भाजप युवा मोर्चा च्या वतीने प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 13 जानेवारी 2023 रोज शनिवारला सकाळी दहा वाजता सुमारास येरखेडा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 संकट मोचन हनुमान मंदिर प्रीती लेयाउट न्यूयेरखेडा येथे नि:शुल्क भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिरात लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ तामीम फाजील व सहकारी तज्ञ डॉक्टर खालील रोगाची तपासणी करण्यात करणार आहे क्रिटी केअर, हृदयरोग ,स्त्रीरोग, नवजात व बालरोग ,युरो सर्जरी किडनी पेशाब, न्यूरो सर्जरी, किडनी रोग, कार्डियल सर्जरी ,इंटरनॅशनल रेडिओलॉजी, गॅस्ट्रोलॉजी ,आर्थोपेडिक, केस रोग ,जनरल लॅप्रोस्कोपी सर्जरी, बर्न मॅनेजमेंट, प्लास्टिक सर्जरी, चर्मरोग, नाक कानकळा रोगाची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी आरोग्य शिबिराच्या मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आव्हान भाजप युवा मोर्चा चे वतीने करण्यात आले आहे.