पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे “पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024” चे आयोजन

– “शाश्वत विकासासाठी बांबू लागवडीचे महत्त्व” याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुंबई :- पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी वसुंधरा अभियान, फोनिक्स फाउंडेशन संस्था आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून ही परिषद यशवंतराव चव्हाण केंद्र येथे होणार आहे.

चार सत्रांच्या या परिषदेचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गोदरेज उद्योगाचे अध्यक्ष नादीर गोदरेज आणि कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या सत्रामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे पर्यावरण समस्यांवरील उपयांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुसरे सत्र पर्यावरण संरक्षणामध्ये बांबूचे महत्व हा विषय असेल. या सत्रास उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. तिसरे सत्र बांबू लागवडीचा कार्यक्रम कशा प्रकारे राबवण्यात येत आहे, या विषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मार्गदर्शन करतील. चौथ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून शाश्वतता याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

या एकदिवसीय परिषदेमध्ये बांबू लागवडीचे महत्व, भविष्यातील बांबू लागवडीमुळे पर्यावरणाचे होणारे रक्षण, जैव इंधनासाठी असलेला बांबूचा पर्याय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रा.डॉ.संगिता टेकाडे यांनी साकारली "मी सावित्रीबाई बोलते"

Fri Jan 5 , 2024
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) उपकेंद्र नागपूर व्दारा ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम बार्टी उपकेंद्रात आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्याने प्रा. डॉ. संगिता टेकाडे एकमेव महिला कलाकार यांनी अत्यंत जिवंत प्रतिमा उभारून “मी सावित्रीबाई बोलतेयं ” हा एकपात्री प्रयोग सादर केला. सावीत्रीबाई फुले यांनी स्वत: शिक्षण शिकूण इतरांना सुशिक्षीत करण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com