जिजाऊ सुपर मार्ट तर्फे 15 मार्च ते 17 मार्च या दरम्यान महिला बॉक्स क्रिकेटचे आयोजन

नागपूर :- जिजाऊ सुपर मार्ट च्यावतीने महिलांनी महिलांकरता दिलेली एक सुवर्णसंधी म्हणून महिलांसाठी बॉक्स क्रिकेट च्या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आणि औद्योगिक स्टॉलचे उद्घाटन शिवश्री विकास ठाकरे पश्चिम विभाग नागपूरचे आमदार यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच रवींद्रजी ठाकरे आयएएस आणि प्रभाकरराव देशमुख प्रसिद्ध उद्योजक यांची उपस्थिती राहतील. प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाचे मधुकरराव मेहकरे, सुलभा कुथे, विनोद काळे, पुरुषोत्तम कडू, अल्फिया शेख आणि राकेश पन्नासे यांची उपस्थिती राहतील.

जिजाऊ सुपर मार्ट मराठा सेवा संघ लॉन्स सुर्वे नगर नागपूर येथे दिनांक 15 ते 17 मार्च या दरम्यान सायंकाळी 5:00 वाजता. ह्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. याप्रसंगी बक्षीस वितरण करण्यात येईल. प्रथम 9000 रुपये – दुसरे बक्षीस 7000 आणि तृतीय बक्षीस 5000 तसेच विविध उत्तेजनार्थ कामगिरी करितांना अनेक बक्षीस देण्यात येईल असे म्हटले गेले आहे.

जिजाऊ सुपर मार्ट आयोजित महिला बॉक्स क्रिकेट 2024

जिजाऊ सुपर मार्ट कडून या उपक्रमाचे आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे महिलांचे प्रत्यक्ष क्षेत्रांमध्ये सक्षमीकरण, सबलीकरण, तसेच सर्वांगांनी विकास व्हावा आणि सोबतच कुटुंब समाज व देशाचा विकास व्हावा. मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर आहे. नागपूरला जिजाऊ सुपर मार्ट स्थापना केली आणि हे मार्ट खूप चांगल्या प्रकारे चालत आहे. आणि या माध्यमातून महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संचालिका याकरिता कटिबद्ध आहेत. मुख्य संचालिका जया देशमुख, कल्पना मेहकरे, वृंदा ठाकरे, अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, प्रणाली दळवी, स्वाती शेंडे, मोहिनी काळे, लीना निकम, मंगला काळे, अनुपमा पोद्दार, यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त बिदरी यांच्या समितीचा अहवाल मान्य

Fri Mar 15 , 2024
Ø नागपूर-अमरावती नझुल जागांसाठी ‘विशेष अभय योजना 2024-25’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशी स्वीकारत राज्य मंत्रीमंडळाने नागपूर व अमरावती विभागातील निवासी कारणांकरिता भाडेतत्त्वावर दिलेल्या नझुल जमिनींसाठी 1 एप्रिल 2024 ते जुलै 2025 या कालावधीसाठी विशेष अभय योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार जमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-1) करण्यासाठी आता बाजार मुल्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!