नागपूर : श्रीरामजन्मोत्सावानिमित्त आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामनगर येथील राममंदिरात भेट दिली. त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेवून पूजा केली. तसेच मंदिरात उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. याप्रंसगी ढोलताशाच्या गजरासह श्रीरामाच्या जय घोषणेने मंदिर परिसर दुमदुमला होता. आमदार प्रविण दटके व श्रीराम मंदिर समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.