पोरवाल महाविद्यालयात स्वर्गिय राकेश कुमारजी पोरवाल यांच्या स्मृतीत रक्तदान शिबीराचे आयोजन..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 29 :- कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी स्वर्गिय राकेश कुमार पोरवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे तर अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ कामठीचे विकास निर्देशक अशोक कुमार भाटिया उपस्थित होते. त्याच बरोबर शिक्षण प्रसारक मंडळ कामठीचे अध्यक्ष सुनील कुमार पोरवाल, सचिव विजय कुमार शर्मा, प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, कार्यक्रम समन्वयक व उप्रप्राचार्या डॉ. रेणू तिवारी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनीता भौमीक मंचासिन होते. प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाने केलेल्या उत्तरोतर प्रगतीचे वर्णन केले. प्रमुख पाहुणे डॉ. दुधे यांनी त्यांच्या भाषणात नवीन शिक्षण प्रणाली व विद्यार्थी यावर आपले मत मांडले. अशोक कुमार भाटिया यांनी त्यांच्या अध्यक्षीय संबोधनात महाविद्यालयाच्या विकासात योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाचे आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना व एन. सी. सी च्या विद्यार्थ्यानी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रेणुका रॉय यांनी तर आभार कार्यक्रमाच्या समंवयिका डॉ. रेणू तिवारी यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गरुड फल्ली का पेड प्रकृति के लिए बरदान से कम नहीं है..

Mon Aug 29 , 2022
नागपूर – प्रकृति ने हमें कईयों उपहार दिये हैं उनमे से एक गरुड बृक्ष भी है। गरुड की फल्लियां बिलकुल सर्प के आकार जैसी दिखाई देती है।सायद इसी कारण इसका नाम गरुड पडा होगा। ग्रामीण विहंगम वनांचलों मे आज भी लोग अपने दरवाजों मे गरुड फल्ली काले य कथई रंग के कपडे मे बांधते है। जिसे देखकर दूर से ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com