संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– गुरुवारी 25 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजता शिबीर
कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्रात गुरुवार दिनांक 25 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.दर पौर्णिमेला एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने पौष पोर्णिमेच्या निमित्ताने उद्या 25 जानेवारीला ध्यान शिबीर होणार आहे.या एक दिवसीय ध्यान शिबिरामध्ये किमान एक ,दहा दिवसीय शिबीर केलेल्या साधकांना थेट सहभागी होता येईल.
तसेच 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत 10 दिवसीय निवासी ध्यान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.या दहा दिवसीय शिबिरामध्ये नवीन व जुन्या साधकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून सहभागी घेता येईल अशी माहिती ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.उल्लेखनीय आहे की, दर महिन्याला 10 दिवसीय व 3 दिवसीय निवासी शिबीर व दर पोर्णिमेला 1 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येत असून इच्छुक साधकांना http://forms.gle/HWPAahSOKXLnRw3A या वेबसाईट वर ऑनलाईन च्या माध्यमातून नोंदणी करता येईल.