ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्रात पोर्णिमेनिमित्त एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– गुरुवारी 25 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजता शिबीर

कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्रात गुरुवार दिनांक 25 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.दर पौर्णिमेला एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने पौष पोर्णिमेच्या निमित्ताने उद्या 25 जानेवारीला ध्यान शिबीर होणार आहे.या एक दिवसीय ध्यान शिबिरामध्ये किमान एक ,दहा दिवसीय शिबीर केलेल्या साधकांना थेट सहभागी होता येईल.

तसेच 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत 10 दिवसीय निवासी ध्यान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.या दहा दिवसीय शिबिरामध्ये नवीन व जुन्या साधकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून सहभागी घेता येईल अशी माहिती ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा  कुंभारे यांनी दिली.उल्लेखनीय आहे की, दर महिन्याला 10 दिवसीय व 3 दिवसीय निवासी शिबीर व दर पोर्णिमेला 1 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येत असून इच्छुक साधकांना http://forms.gle/HWPAahSOKXLnRw3A या वेबसाईट वर ऑनलाईन च्या माध्यमातून नोंदणी करता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रकाश लोणारे सपत्नीक दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त निवड

Wed Jan 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिन परेड ( RDP. ) २०२४ चे साक्षीदार होण्यासाठी विशेष अतिथी म्हणून नागपुर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील मच्छीमार सहकारी संस्था चळवळीचे आधारस्तंभ प्रकाश लोणारे यांच्या सहपत्नी गीता लोणारे यांना केंद्र सरकारच्या वतीने विशिष्ठ अतिथी म्हणून निवड करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com