झिरो माईल युथ तर्फे ‘या उन्हाळ्यात निरोगी कसे रहावे’ वर ऑनलाईन सत्र

नागपुर :- उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतांना, आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे . मार्च महिना सुरू होताच देशाच्या काही भागात अचानक तापमानात वाढ होते. यंदाच्या तापमानाची स्थिती पाहता यावेळी कडक ऊन पडणार असल्याचे बोलले जात आहे.दिवसेंदिवस उन्हाळा अधिकच वाढतो आहे. त्यातच विदर्भातील ऊन भयंकर रूप धारण करते हे जगाला माहिती आहे.प्रतिवर्षी उन्हाळा त्याच हंगामात येत असला तरी तापमानाचे प्रमाण अधिक वाढते आहे. ज्यामुळे नागरिकांनी-युवकांनी काळजी घेणे महत्वाचे ठरते,जेष्ठ नागरिकांनाच नाही तर अनेक तरुणांना उन्हाळ्याचा त्रास जाणवतो. आहारात योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे असून उष्माघाताने अनेकांचा जीव गेलेला आपण दरवर्षी ऐकतो.

उन्हाळ्यात काय खावे? किती खावे? उन्हापासून बचाव कसा करावा? आरोग्य बिघडले तर त्वरित काय उपाय करावे? या समस्येवर उत्तर व खबरदारी म्हणून झिरो माईल युथ फाउंडेशन,डोन्ट वरी ग्रुप व यंग अल्युमनी असोसिएशन ऑफ़ गवर्मेन्ट इंस्टीट्यूट ऑफ़ सायन्स नागपूर तर्फे या ‘उन्हाळ्यात निरोगी रहा’ या विषयाला घेऊन सोमवार ला संध्याकाळी ७ वाजता गूगल मीट वर ऑनलाईन १८ वे व्याख्यान आयोजित केले असून प्रसिद्ध आहारतज्ञ मीनल भोयर मार्गदर्शन करणार असून मिनल भोयर ह्या सेव्हन स्टार हॉस्पिटल व गिल्लुरकर हॉस्पिटल मधे मुख्य आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. या सत्रात उन्हाळ्यातील आहार,दिनचर्या, खबरदारी व उपाय यावर मार्गदर्शन होणार असून प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून सुद्धा चर्चा होणार आहे.सत्रात सहभागी होण्यासाठी ९५४५७४५५८० यावर संपर्क करावे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CIDC Vishwakarma Best Officer Award-2023 to Dr Dixit

Sat Apr 15 , 2023
– Maha Metro Awarded for Utilization of 5D BIM Technology,14th CIDC Vishwakarma Awards-2023 Held at Delhi NAGPUR: Maha Metro MD Dr Brijesh Dixit was felicitated with Vishwakarma Best Officer Award at an event held in New Delhi today. The award was given by Construction Industry Development Council (CIDC), which is part of NITI Aayog. The award was presented on the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com