नवरात्रोत्सव परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेची एक खिडकी सुविधा

https://pandal.cmcchandrapur.com/

येथे भेट देऊन करावा ऑनलाईन अर्ज  

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची (single window system ) सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज (Application) सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.

येत्या २६ सप्टेंबर रोजी घटस्थापना असुन ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे. ऐनवेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्‍या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मनपातर्फे पीओपी मूर्ती ठेवणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.

एक खिडकी योजना

सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या संकेतस्थळावर quick link सदरात pandal permission 2022 येथे ही लिंक उपलब्ध आहे. अथवा https://pandal.cmcchandrapur.com/ येथे भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. यामध्ये पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विविध विभागांचे प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर मनपात अभियंता दिन साजरा  

Fri Sep 16 , 2022
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत दि. १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन राणी हिराई सभागृहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, संजय जोगी व विभिन्न विभागात कार्यरत सर्व अभियंते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले कि, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिनानिमित्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com