संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मौदा तालुक्यातील झुल्लर येथील श्रीजीं ब्लॉक कंपनीमध्ये आज पहाटे जवळपास 3:30 च्या दरम्यान झालेल्या भयंकर बॉयलर ब्लास्टने एकाचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जख्मि झाले असून मृतक मध्ये नंदकिशोर करंडे रा झुल्लर चा समावेश आहे तर जख्मि मध्ये राजेंद्र किसन उमप(झुल्लर), हुसेन बाशीर सय्यद(वडो दा), स्वप्निल नारायण सोनकर(वडो दा), कल्लू उमेदा शाहू(वडो दा), कुवरलाल गुणाजी भगत(वडो दा), वंश विष्णुजी वानखेडे (झुल्लर), .गुणवंत दौलतराव गजभिये(वडो दा), रामकृष्ण मनोहर विभुते(वडो दा), ब्रह्मानंद रामाजी मानेगुडधे (राणमांगली) या कामगारांचा समावेश आहे.
या सर्व गँभीर जख्मि कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोबतच या भयंकर घटनेत तीन बकऱ्या देखील मृत झाल्या आणि आजूबाजूच्या शेतातील सहा घरांचे मोठे नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेने मृतकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीं म्हणून जिल्हा परीषद नागपूर च्या महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा अवंतिका यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वना दिली.
तसेच यासंदर्भात कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याशी भेट घालून कंपनीच्या माध्यमातून मृतकाच्या कुटुंबीयांसाठी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली असून. या कठीण प्रसंगात आम्ही सर्व कुटुंबीयांसोबत आहोत .
घटनेत मृत पावलेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी मौदा तालुका कांग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे , शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, भाजपा अनु.जाती अध्यक्ष नरेश मोटघरे, सरपंच. विद्या वानखेडे, माजी सरपंच चंद्रशेखर वानखेडे, पोलीस पाटील. अपर्णा वानखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष वडोदा सुधाकर ठवकर, वडोदा ग्रा.पं. सदस्य पंकज ढोरे.तसेच ग्रा.पं. सदस्य महेंद्र मोटघरे, ग्रा.पं. सदस्य रत्नाकर पाटील, सुभाष पाठराबे, शंकर झलके, शंकर वानखेडे, नागोराव वानखेडे, अंकुश बर्वे, सुधाकर खेरगडे आणि समस्त नागरिक उपस्थित होते.